आपल्या घरात सर्वात पवित्र आणि मनाला शांती देणारं स्थान म्हणजे देवघर. दररोज देवपूजा, प्रार्थना करुन आम्ही देवाचे आभार मानतो. हे स्थान अत्यंत शुभ स्थान असतं. येथून सकारात्मकता आपल्यात प्रवेश करते म्हणून येथील वास्तु देखील योग्य असावी.
देवघर सकारात्मक उर्जेचा प्रमुख स्रोत असून यामुळे जीवनातील सर्वस्व गोष्टींची प्राप्ती होते. आरोग्य, नाती, आर्थिक स्थिती, मन:शांती सर्व येथील सकारात्म ऊर्जेमुळे शक्य होतं.
देवघर वास्तु नियम
देवघरातील स्लॅबचे आकार घुमट किंवा पिरॅमिड असावे.
शयनकक्षात आणि शयनकक्षाला लागलेल्या भिंतीला देवघर नसावे.
स्नानगृह किंवा शौचालयाला लागून किंवा खाली देवघर नसावे.
देवघराजवळ कचरा, अटाळा, फालतू सामान नसावं.
देवघरात खंडित मूर्ती किंवा प्रतिमा मुळीच ठेवू नये.
देवघरात मुरत्या जमिनीवर ठेवू नयेत. मुरत्या ठेवण्यासाठी व्यासपीठ असावे, त्यावर रेशीम आसान असावे.
देवघरासाठी पिवळा किंवा पांढरा रंग सर्वात योग्य ठरेल.