Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कामधेनू शंख घरात ठेवा, सर्व कामना पूर्ण होतील

कामधेनू शंख घरात ठेवा, सर्व कामना पूर्ण होतील
, मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (11:53 IST)
समुद्र मंथनाच्या वेळी देव-दानव संघर्षाच्या दरम्यान समुद्रातून 14 मौल्यवान रत्नांची प्राप्ती झाली. या मध्ये 8 व्या रत्नांच्या रूपात शंखांची उत्पत्ती झाली. 
 
नैसर्गिकरित्या शंखाचे बरेच प्रकार आहे. देव शंख, चक्र शंख, राक्षस शंख, शनी शंख, राहू शंख, पंचमुखी शंख, वालमपुरी शंख, बुद्ध शंख, केतू शंख, शेषनाग शंख, कच्छप शंख, सिंह शंख, कुबार गदा शंख, सुदर्शन शंख इत्यादी.
 
त्यापैकी 3 प्रामुख्य आहे - वामावर्ती, दक्षिणावर्ती आणि गणेश शंख किंवा मध्यवर्ती शंख. या अंतर्गत गणेश शंख, पाञ्चजन्य, देवदत्त, महालक्ष्मी शंख, पौण्ड्र, कौरी शंख, हीरा शंख, मोती शंख, अनंतविजय शंख, मणि पुष्पक आणि सुघोषमणि शंख, वीणा शंख, अन्नपूर्णा शंख, ऐरावत शंख, विष्णु शंख, गरूड शंख आणि कामधेनु शंख.
 
कामधेनू शंख : हे शंख फारच दुर्मिळ आहे. हे शंख देखील प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. एक गोमुखी शंख आणि दुसरे कामधेनू शंख. हा शंख कामधेनू गायीच्या मुखाप्रमाणे असल्यामुळे याला गोमुखी कामधेनू शंख या नावाने ओळखले जाते.
 
5 फायदे -
1 असे म्हणतात की कामधेनू शंखाची पूजा केल्याने तर्कशक्ती बळकट होते. हा शंख घरात ठेवल्याने मन आनंदी राहतं.
2 महर्षी पुलस्त्य आणि ऋषी वशिष्ठ यांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी या शंखाचा वापर केला होता.
3 पौराणिक शास्त्रांमध्ये याचा वापर करून धन आणि समृद्धी कायम स्वरूपी वाढवता येते.
4 हे घरात असल्यानं सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात. कलियुगात माणसाच्या मनातली इच्छापूर्तीचे हे एकमेव साधन आहे. या शंखाला कल्पनाशक्ती पूर्ण करणारे देखील म्हटले गेले आहे. 
5 कामधेनू शंख मंत्र या प्रकारे आहे: ऊँ नमः गोमुखी कामधेनु शंखाय मम् सर्व कार्य सिद्धि कुरु-कुरु नमः

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तू शास्त्रानुसार घरात या ठिकाणी पाणी ठेवू नये