Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुप्रमाणे दगडाच्या घराचा आपल्या जीवनावर प्रतिकूल पडतो!

वास्तुप्रमाणे दगडाच्या घराचा आपल्या जीवनावर प्रतिकूल पडतो!
, बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (08:16 IST)
पुर्वी मातीची घरे असायची. दगड, माती व लाकूड यांचा वापर करून घरे बांधली जात होती. परंतु, आता आधुनिक काळात विटा, सिमेंट, चुना व आसारीचा वापर घर बांधणीत केला जातो. दगडी ठोकळे एकावर एक ठेवून घरे बांधली जात असत. दगडाच्या घराचा आपल्या जीवनावर प्रतिकूल प्रभाव पडत असतो. कसा तो पहा.
 
1. घरासमोर दगडी खांब असेल तर त्या घरातील मुख्य व्यक्ती भांडणप्रिय असते. ही व्यक्ती कुणाशीही वाद घालण्यात अग्रेसर भूमिका घेत असते.
 
2. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एखादा मोठ्या आकाराचा दगड असेल तर त्या घरात नेहमी वाद होतात. घरातील सदस्य एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. काही वेळा तर अशी वेळ येते की, त्या घरात नवरा बायको यांच्यात झालेले वाद विकोपाला जाऊन त्याच्यात काडीमोड होण्याची शक्यता असते.
 
3. घरासमोर मुरूमाची टेकडी‍ किंवा दगडी जुनाट वास्तू असेल तर त्या घरातील मुख्य व्यक्ती व त्याची मुलांमध्ये नेहमी भितीचे वातावरण असते. त्या घरातील प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागतो.
 
4 घरासमोर, आजूबाजूला किंवा मागे पडलेली दगडी वास्तू असेल तर त्या घरात कोणत्याच बाजूने विकास होत नाही. मुलांच्या शिक्षणात बर्‍याच अडचणी येतात.
 
5. दगडी पडक्या वास्तूच्या जवळ राहणार्‍याना तर अचडणी येतात तसेच त्याच्या आसपास राहणार्‍या नागरिकानाही मोठ्या अडचणीना तोंड द्यावे लागते.
 
6 घरात नेहमी गरीबी नांदत असते. व्यवसाय व्यापारात यश मिळत नाही. तसेच नोकरीतही वाद उद्‍भवत असतात.
 
7 काही घरात दगडाच्या कमानी उभ्या केलेल्या असतात. अशा घरात राहणार्‍या नागरिकांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तू आण तुमची राशी!