Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे रंग वापरून बघा, नशीब चमकेल

हे रंग वापरून बघा, नशीब चमकेल
, शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (14:59 IST)
1 आपल्या घरातील बजेट (अर्थव्यवस्था) कोलमडलेली असल्यावर तसेच कमावायचे सर्व प्रयत्न केल्यावर देखील आपणास बघावे तसे यश येत नसल्यास पारिवारिक स्थिती विस्कटून जाते अश्या वेळेस देवाला प्रसन्न करण्यासाठी घराच्या देवघरात लाल रंग करावे.
 
2 आपण ज्या ठिकाणी आपले पाकीट ठेवाल ती जागा लाल आणि पिवळ्या रंगाने रंगून घ्या. आपल्याला काही दिवसातच फरक जाणवेल. आपल्याला जर का असे जाणवत असेल की आपला कोणी हैवा करतो किंवा आपले बरेच शत्रू आहे. असुरक्षा जाणवत असल्यास घरात दक्षिण दिशेस पाणी ठेवल्यास त्वरित तिथून जागा बदला. त्या जागेवर लाल आणि पिवळी मेणबत्ती लावावी. तसेच आग्नेय कोपऱ्यात लाल मेणबत्ती लावावी.
 
3 घरात लग्नाच्या वयाच्या मुलीच्या विवाहात काही अडचणी येत असल्यास मुलीच्या झोपण्याचा खोलीच्या भिंतीचा रंग हलका ठेवावा. त्याचबरोबर पलंगावरच्या चादरीचा रंग पिवळा ठेवावा. मुलीची खोली कोपऱ्यात असावी.
 
4 कधी - कधी सर्व योग्यता असून देखील नोकरी मिळत नाही. त्यासाठीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. अश्या परिस्थिती एक उपाय करा- ज्यावेळी आपण साक्षात्काराला जाताना आपल्या जवळ लाल रंगाचा रुमाल बाळगा. शक्य असल्यास लाल रंगाचा शर्ट घालून जा. लक्षात ठेवा शक्य असल्यास लाल रंगाचा वापर जास्त करावा.
 
5 लाल रंग चटचटीत असल्याने उग्र वाटतो. रात्री झोपताना झोपण्याचा खोलीत पिवळ्या रंगाचा वापर करावा. लाल, पिवळे आणि सोनेरी हे तीन रंग आपले नशीब बलवत्तर करतात. नशीब बलवत्तर करण्यासाठी या रंगाचा वापर करावा. यश मिळेल.
 
6 पिवळा रंग नशिबास झळकवतो. पिवळा रंग शुभ मानला जातो. लग्न कार्यात सुद्धा पिवळ्या रंगाचा जास्त वापर केला जातो. असे म्हणतात की पिवळ्या रंगाचा वापर केल्याने मुलीला सासरी सौख्य मिळते.
 
7 हळद ही लग्न कार्यासाठी शुभ मानली जाते. असे म्हणतात की हळदीमध्ये गणेशाचा वास आहे आणि ज्या कार्यात खुद्द गणपती आहे ते कार्य यशस्वी होणारच. कधी कधी हळदीच्या ढेकड्यात गणेशाचे चित्र सापडते. लक्ष्मी अन्नपूर्णेला हरिद्रा असेही म्हटले जाते. श्रीसूक्तात असे ही वर्णिले आहे की देवी लक्ष्मीने पिवळे वस्त्र धारण केले आहे. यावरून हळद किती महत्त्वाची आहे आपण असे समजू शकता. एवढेच नव्हे तर गुरुदेव बृहस्पतीचा रंग देखील पिवळाच असतो आणि बृहस्पतीचा रत्न पुष्कराज असतो आणि पिवळ्या पुष्कराजाला घालून आपणास बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोप्या 15 वास्तू टिप्स, अमलात आणल्यास बदलेल आपलं आयुष्य