घराच्या प्रवेशदारात स्वस्तिक किंवा ॐ ची आकृती लावल्याने घर-परिवारात शांतीची स्थिती निर्माण होते.
ज्या घरात किंवा जागेवर मंदिराची पाठ पडत असेल तेथे राहणारे लोक नेहमी अडचणीत असतात, म्हणून या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.
समृद्धीसाठी उत्तर-पूर्व दिशेत पाण्याचे कलश ठेवावे.
घरात ताण तणाव किंवा अशांती असेल तर बैठकीत फुलांचा गुलदस्ता ठेवायला पाहिजे.
ग्रंथ नेहमी नैऋत्यकडे, दक्षिणेस किंवा पश्चिमेस ठेवावेत, त्यास कालत्रयी ईशान्येस ठेऊ नये. ग्रंथालयात कोणत्याही प्रकारचे आरसे नसावेत, त्यामुळे वाचकांची एकाग्रता कमी होते.