Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हळद, पुदीनाचे रोप दूर करतात हे वास्तू दोष

webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (12:38 IST)
वास्तू दोषात आग्नेय दिशेचा विशेष दोष मानला जातो. आग्नेय दिशेने सदोषपणामुळे एखाद्या व्यक्तीला घरात अनेक समस्या येतात. आग्नेय कोनाचा दोष दूर करण्यासाठी, लाल रंगाचा बल्ब किंवा दिवा या प्रकारे पेटवावे की तो सुमारे तीन तास जळत राहायला पाहिजे. यासाठी गणेशाची मूर्ती बसवावी. हा दोष दुरुस्त करण्यासाठी मनिप्लांटला आग्नेय दिशेने स्थापित करणे देखील शुभ मानले जाते. त्याच प्रकारे आग्नेय दिशेत सूर्यफूल, पालक, तुळस, गाजर, आले, हिरव्या मिरच्या, मेथी, हळद, पुदिना आणि कढीपत्त्याची लागवडही लावू शकता.
 
या दिशेचा दोष दूर करण्यासाठी, रेशमी कपडे, वस्त्र, सौंदर्य वस्तू भेट म्हणून घरातील महिलांना देऊन त्यांना नेहमीच आनंदी ठेवा. या दिशेने शुक्र यंत्र स्थापित करणे देखील चांगले आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील दिशेचे दोष दूर करण्यासाठी घराच्या सर्वात वजनदार वस्तू या दिशेने ठेवल्या पाहिजेत. तसेच मंगळ ग्रहाचे दान केले पाहिजे. दक्षिण दिशेच्या भिंतीवर लाल रंगाच्या हनुमानाचे चित्र लावावे. मंगल यंत्र दक्षिण दिशेच्या भिंतीवर स्थापित करायला पाहिजे. या ठिकाणी रिकामी जागा असल्यास, कुंडी ठेवू शकता. नैरृत्य दिशेचा दोष दूर करण्यासाठी भारी मुरत्या देखील ठेवू शकता. नैरृत्य दिशेत राहू मंत्रांचा जप करावा. चांदी, सोने किंवा तांब्याचे नाणे किंवा नाग-नागिणाच्या जोड्याची पूजा करून त्यांना नैरृत्य कोनाच्या दिशेने दाबा. तसेच, या दिशेने राहू यंत्र स्थापित केले पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 8 ते 14 मार्च 2020