Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुदोष निवारणाचे उपाय

वास्तुदोष निवारणाचे उपाय
घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाही‍त. हा आपला गैर समज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात. 

* आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपर्‍यात ठेवावे.

* आपल्या शयनकक्षात खरगटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते.

* कुटूंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे.

* कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे.

* घरातील पुरूष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दीवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी.

* शयनकक्षात झाडू नये. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशी जवळ लाल चंदन ठेऊन झोपावे.

* जर दुकानात नेहमी चोरी होत असेल तर दुकानाच्या पायरीजवळ पूजा करून मंगल यंत्राची स्थापना करावी.

* दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्याद्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी.

* घरातील ज‍िन्याखाली बसून महत्त्वपूर्ण कार्य करू नये.

* दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.

* गुप्त शत्रु त्रास देत असतील तर चांदीचा नाग तयार करून करून झोपताना त्यांना पायाशी ठेवले पाहिजे.

* नवीन जागी मन रमत नसेल, कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.

* घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद थिंपळावी व ब्राम्हणास पिवळे वस्त्र दान करावे.

* जर संतती सुख नसेल, मुलगा व वडील यांच्यात जमत नसेल तर सूर्य यंत्र मुख्यप्रवेशद्वारमध्ये ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 24.03.2018