Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुशास्त्राबाबत सामान्य नियम

वास्तुशास्त्राबाबत सामान्य नियम
सध्या वास्तुशा‍स्‍त्राला महत्त्व आले आहे. परंतु, याबाबतच्या किचकट नियमांमुळे अनेकांना हे शास्त्र कसे पाळावे ते कळत नाही. संभ्रमावस्थेतच तो वास्तुत निवास करतो.

चारही दिशांनी मिळणार्‍या ऊर्जेच्या लहरींचे संतुलन ठेवणे हाच वास्तुविज्ञानाचा स्पष्ट अर्थ आहे. ऊर्जेच्या लहरींचे संतुलन नसेल तर घरात शांती राहणार नाही. यामुळे दिशांच्या संतुलनासाठी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात...

webdunia
  WD
1. किचन दक्षिण-पूर्व दिशेला असावे. मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला तर मुलांचे बेडरूम उत्तर-पश्चिम दिशेला असावे. शौचालय दक्षिण दिशेतच असावे.
2. पाण्याची व्यवस्था उत्तर दिशेत असावी. ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला खुली जागा ठेवावी. दक्षिण-पश्चिम दिशेला अवजड वस्तू ठेवता येतील.
3. मुख्य दरवाजा अन्य दरवाज्यांपेक्षा मोठा व जड असावा.
4. खि‍डक्या व दरवाजे सम संख्येत असावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेत असावे.
5. तीन दरवाजे सलग एका रेषेत असू नये.
6. पूजेसाठी ईशान्य कोन असावा. देवांचे तोंड ईशान्य दिशेलाच असावे.
7. उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे.
8. पूर्वजांचे फोटो पूजाघरात ठेवू नयेत. दक्षिणेतील भिंतीवर ते फोटो लावावेत.
9. संध्याकाळी घरात पूजा करावी.
10. इष्टदेवतेचे ध्यान आणि पूजन नियमित करावे.
11. आपल्या उत्पन्नाच्या हिस्सा इष्टदेवाच्या नावाने नियमित वेगळा ठेवावा. त्यामुळे घरात समृध्दी राहते.

घरातील मुख्य दरवाजा दक्षिण वा पश्चिम दिशेला असल्या तो शुभ मानले जात नाही. परंतु, हे निश्चित करण्यासाठी जन्मपत्रिका पाहाणे आवश्यक आहे. काही राशींच्या व्यक्तींसाठी हे खूपच शुभ ठरु शकते. विशेषत: ज्यांच्या कुंडलीत शनी आणि मंगळ शुभ असेल त्यांच्यासाठी दक्षिण व पश्चिम दिशेला दरवाजा शुभ ठरतो. शेवटी सर्वच गोष्टींचा विचार करुन वास्तुबाबत निर्णय घ्यावा. त्यामुळे घरात सुख, शांती नांदेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (18.05.2018)