साहित्य : दोन कप सुके हिरवे वाटाणे, एक लिंबू, अर्धा मोठा चमचा लाल तिखट, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा चाट मसाला, तीन उकडलेले बटाटे, दोन कच्ची केळी, तळण्यासाठी तेल, अर्धा लहान चमचा आल्याची पेस्ट.
कृती : वाटाण्यात आल व मीठ टाकून उकडून घ्या व त्यात सर्व मसाले टाकून कोरड मिश्रण तयार करा, त्यात कोथिंबीर टाका, आता बटाटा व केळी एकत्र करून कुस्करुन घट्ट मळून घ्या, त्याच गोळे बनवा, प्रत्येक गोळ्याची पारी बनवून त्यात वाटाण्याच मिश्रण भरुन पॅटिससारखा आकार द्या. नॉनस्टिक पॅनमध्ये तळून घ्या, सॉस, चटणीसह खायला द्या.