साहित्य - 1 कप मैदा, 2 ते 3 उकडून मॅश केलेली कच्ची केळी, 1 चमचा ओवा, 5 चमचे गोड तेल, 1 चमचा जिरं पूड, 1 चमचा आमसूल पूड, 1 चमचा धणेपूड, हळद, तिखट, मीठ, आलं -लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती - सर्वप्रथम मैद्यामध्ये गोड तेलाचे मोयन, ओवा, मीठ, घालून लागतं लागतं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचे. ह्या गोळ्याला 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे.
सारणासाठी कृती - कढईमध्ये तेल घालून या मध्ये जीरपूड, आलं लसूण पेस्ट, आमसूल पूड, मॅश केलेले केळी, हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यायचे. ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
समोसे बनविण्यासाठीची कृती - आता या भिजवलेल्या गोळ्याचे बारीक गोळे करून घ्याचे. मैद्याची पोळी लाटायची. पारी जास्त जाड किंवा बारीक नसावी. अगदी मध्यमसर लाटावी. आता त्या पोळीचे मधून काप करावे. त्या कापाच्या वरील टोकाला पाणी लावून त्याला खालचे टोक जोडावे. आता त्याला त्रिकोणाकार आकार द्यावा. त्यामध्ये सारण भरावे आणि पुन्हा सर्व बाजच्या कड्यांना पाणी लावून चिकटवून घ्यावे. आता समोसे कढईत तेल गरम करून मध्य आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळावे.
चिंचेच्या चटणी किंवा हिरव्या चटणी सोबत गरमागरम खुसखुशीत समोसे सर्व्ह करावे.