Publish Date: Tue, 05 May 2026 (08:00 IST)
Updated Date: Mon, 04 May 2026 (16:37 IST)
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी हलका आणि पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं. दुधी भोपळा शरीराला थंडावा देतो, तर पुदिना पचनशक्ती सुधारतो. हे 'डेडली कॉम्बिनेशन' चवीला तर उत्तम आहेच, पण आरोग्यासाठीही वरदान आहे.
दुधी भोपळ्याचे पौष्टिक थालीपीठ
दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात, जे वजन घटवण्यासाठी मदत करतात.
साहित्य: किसलेला दुधी भोपळा: १ मोठा कप (पाणी पिळून काढू नका)
पीठ: अर्धा कप ज्वारीचे पीठ, पाव कप बेसन आणि २ चमचे नाचणीचे पीठ.
मसाले: हिरवी मिरची-आलं पेस्ट, हळद, ओवा, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ.
कोथिंबीर: बारीक चिरलेली.
कृती:
एका परातीत किसलेला दुधी घेऊन त्यात सर्व पिठे आणि मसाले एकत्र करा. दुधीला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे लागेल तसंच पाणी वापरून पीठ मळून घ्या. तव्यावर थोडं तेल/तूप लावून सुती कापडावर किंवा थेट तव्यावर थालीपीठ थापा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
रिफ्रेशिंग पुदिना चटणीही चटणी केवळ चव वाढवत नाही, तर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
साहित्य:
१ कप फ्रेश पुदिना पाने
अर्धा कप कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा लिंबाचा रस (चरबी जाळण्यास मदत करतो)
भाजलेले जिरे आणि काळं मीठ.
कृती:
सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटून घ्या. तुमची झटपट आणि हेल्दी चटणी तयार!
हे कोंबो वजन कमी करण्यासाठी का प्रभावी आहे?
फायबर युक्तपोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे भूक कमी लागते.
कमी कॅलरीदुधी आणि पुदिना दोन्हीमध्ये कॅलरीज अत्यंत कमी आहेत.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते.
ओवा आणि पुदिना यामुळे गॅस किंवा अपचनाचा त्रास होत नाही.
थालीपीठ भाजताना तेलाचा वापर कमीत कमी करा किंवा शक्य असल्यास 'नॉन-स्टिक' तवा वापरा. दह्यासोबत हे थालीपीठ खाल्ल्यास अधिक फायदा होतो!
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे....
आणखी वाचा