साहित्य -
5 उकळलेले बटाटे
2 चमचे कॉर्न स्टार्च
चीज क्यूब्यस
3 हिरव्या मिरच्या
2 चमचे कापलेली कोथिंबीर
काळीमिरी पावडर
मीठा चवीप्रमाणे
तेल
कृती
बटाटे मॅश करुन त्यात कॉर्न स्टार्च, मिरच्या, मिरपूड, मीठ मिसळा. यात कोथिंबीर टाकून गोळ आकार द्या. प्रत्येक गोळ्यात एक-एक चीज क्यूब स्टफ करा. गरम तेलात गोल्डन ब्राउन होयपर्यंत तळून घ्या. पॉटेटो बॉल्स तयार आहे. हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.