काकडी ही सुपरफूड पेक्षा कमी नाही. अनेक लोक काकडीचा उपयोग सलाड मध्ये करतात. तसेच काकडीचे साल काढल्यानंतर ते फेकून देतात. आज आपण याच सालांपासून बनणारी काकडीची अप्रतिम भाजी सांगणार आहोत जी आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगली आहे. तर चला जाणून घ्या रेसिपी.
साहित्य-
काकडीची साल- 1 किलो
कांदा- 1 बारीक चिरलेला
लसूण- 1
जिरे- अर्धा चमचे
धणे पूड- 1 चमचा
गरम मसाला- 1/2 चमचा
हळद- 1/2 चमचा
तिखट- 1 चमचा
आमसूल पावडर- 1 चमचा
मीठ
कृती-
काकडीच्या सालीची भाजी बनवण्यासाठी प्रथम त्या धुवून त्यांचे बारीक तुकडे करावे. आता एका कढईमध्ये पाणी घालून काकडीचे साल 5 मिनिट उकळण्यासाठी ठेवावे. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि जिरे घालावे. आता हा मसाला कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यावा. तसेच नंतर सर्व कोरडे मसाले आणि मीठ घालून मिक्स करा. आता यानंतर उकडलेल्या काकडीची साले कढईत टाका आणि मसाल्यात मिक्स करा. आता झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. तर चला तयार आहे आपली स्वादिष्ट काकडीच्या सालीची भाजी. जी तुम्ही पराठा आणि पोळी सोबत खाऊ शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik