रोज रात्री काय बनवावे हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. तसेच कधी कधी तर काहीच सुचत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला लज्जतदार अशी रेसिपी सांगणार आहोत. जी चवीला तर स्वादिष्ट आहे तसेच बनवायला देखील सोप्पी आहे. तर चला जाणून घेऊन कोफ्ता पुलाव कसा बनवावा. तर चला लिहून घ्या रेसिपी.
कोफ्ता बनवण्यासाठी
साहित्य-
1 कप किसलेले पनीर
1/2 कप उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
1 चमचा तूप
1/4 कप बारीक चिरलेला कांदा
1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
1 चमचा जिरे
1 चमचा गरम मसाला
1/2 चमचा हळद
1/2 चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
पुलाव बनवण्यासाठी:
साहित्य-
2 कप बासमती तांदूळ
1 मोठा कांदा
1 तमालपत्र
3 लवंगा
3 हिरव्या वेलची
1 दालचिनी
1 चमचा जिरे
1 चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
4 कप पाणी
कृती-
एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, मॅश केलेले बटाटे, कांदा, धणे, जिरे, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ एकत्रित करावे. हे सर्व मिक्स केल्यानंतर मध्यम गोळे बनवा. आता नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गोळे तळून घ्या. यानंतर एका मोठ्या भांड्यात थोडे तूप गरम करावे. व त्यामध्ये तमालपत्र, लवंगा, वेलची, दालचिनी आणि जिरे टाकून तडतडू द्या. त्यात कांदा घालावा. भिजवलेले तांदूळ गाळून भांड्यात टाकावे. तसेच तांदूळ मसाल्यांचा सुगंध शोषून घेण्यासाठी परतवून घ्यावा. आता भातामध्ये पाणी, मीठ आणि गरम मसाला घाला. तसेच उकळी येऊ द्या. मग झाकण ठेवून शिजवावे. शिजवलेल्या पुलावात कोफ्ते घालून मिक्स करा. आणखी 3 मिनिटे मंद गॅसवर शिजवा. तर चला आपला कोफ्ता पुलाव तयार आहे. लोणच्यासोबत देखील सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik