rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

Republic Day Special Recipes
, बुधवार, 21 जानेवारी 2026 (08:00 IST)
२६ जानेवारीला आपण सर्वजण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या राष्ट्रीय सणाचे घराघरात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी देशभक्तीचा उत्साह वाढवण्यासाठी 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित काही खास पाककृती आज आपण पाहणार आहोत ज्या तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील. 
 

तिरंगा ढोकळा

तिरंगा ढोकळा हा दिसायला अत्यंत आकर्षक आणि खायला हलका असा पदार्थ आहे.
केशरी थर: रवा किंवा बेसनाच्या पिठात गाजराची प्युरी किंवा थोडे लाल तिखट आणि हळद घाला.
पांढरा थर: नियमित रवा किंवा तांदळाच्या पिठाचे पांढरे मिश्रण.
हिरवा थर: मिश्रणात पालकाची प्युरी किंवा हिरव्या मिरची-कोथिंबिरीची पेस्ट घाला.
 
कृती
तिन्ही थर एकावर एक वाफवून घ्या (प्रथम हिरवा, मग पांढरा आणि शेवटी केशरी). थंड झाल्यावर वड्या पाडून मोहरी-कढीपत्त्याची फोडणी द्या.
 

तिरंगा पुलाव

तिरंगा पुलाव हा प्रजासत्ताक दिनाच्या खास बेतासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
साहित्य
बासमती तांदूळ, पालक प्युरी, टोमॅटो प्युरी किंवा केशर, खडा मसाला आणि तूप.
कृती
तांदळाचे तीन भाग करा. एका भागात पालकाची फोडणी देऊन हिरवा भात करा, दुसऱ्या भागात टोमॅटो किंवा केशराचा वापर करून केशरी भात करा आणि तिसरा भाग साधा पांढरा ठेवा. प्लेटमध्ये वाढताना तिरंग्याप्रमाणे सजवा.
 

तिरंगा सँडविच 

मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तिरंगा सँडविच झटपट होणारा पदार्थ आहे.
साहित्य
ब्रेड स्लाईस, पुदिना चटणी, मेयॉनीज किंवा पनीर, आणि शेजवान सॉस किंवा किसलेले गाजर.
कृती
एका ब्रेडवर हिरवी चटणी लावा, त्यावर दुसरा ब्रेड ठेवून मेयॉनीज लावा आणि तिसऱ्या ब्रेडवर गाजराचे मिश्रण लावून तिरंगा सँडविच तयार करा.
 

तिरंगा बर्फी

तिरंगा बर्फी सण गोडधोड असल्याशिवाय पूर्ण होत नाही. ओल्या नारळाची किंवा माव्याची बर्फी तुम्ही तीन रंगात बनवू शकता.
साहित्य
ओला नारळ, साखर, दूध आणि खाण्याचा केशरी व हिरवा रंग (किंवा नैसर्गिक पर्याय म्हणून केशर आणि पिस्ता इ.)
कृती
नारळ आणि साखरेचे मिश्रण शिजवून त्याचे तीन भाग करा. एका भागात केशरी रंग, एका भागात हिरवा रंग आणि एक भाग पांढरा ठेवा. ताटात एकावर एक थर लावून वड्या पाडा.
 
नैसर्गिक रंगांसाठी काही टिप्स 
हिरवा रंग: पालक, कोथिंबीर किंवा पुदिना वापरा.
केशरी रंग: गाजराचा रस, केशर किंवा काश्मिरी लाल तिखट (तिखट पदार्थांसाठी) वापरा.
पांढरा रंग: नारळ, पनीर, मेयॉनीज किंवा तांदूळ वापरा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरीच बनवा अगदी रेस्टॉरंट स्टाईल Chicken Chukuni Recipe