Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या
, शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (20:00 IST)
हिवाळ्याच्या दिवसात मेथिची चव चांगली लागते. मेथीच्या सेवनाने पाचन क्रिया सुरळीत राहते. मेथीचे पराठे लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. व लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लंच मध्ये देऊ शकतात. तर जाणून घेऊ या मेथी पराठा चांगला आणि सोप्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी 
 
साहित्य 
2 कप गव्हाचे पीठ 
1 मेथी जुडी  
1/4 कप दही
1/2 छोटा चमचा लाल मिर्ची पूड 
1/4 छोटा चमचा जीरेपूड 
1/2 छोटा चमचा ओवा 
1/2 छोटा चमचा हळद 
1 छोटा चमचा आल्याची पेस्ट
तेल गरजेप्रमाणे 
मीठ चवीनुसार 
 
कृती
मेथीचा पराठा बनवण्याआधी मेथी स्वच्छ धुवून घ्या. आता मोठया परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात दही, ओवा सोबत सर्व वस्तु घाला . मग चवीनुसार मीठ घाला. आता या पिठाला मळून घ्या व काही वेळ तसेच ठेवा. आता पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून पराठा लाटून घ्या. व गॅसवर तवा ठेऊन त्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.  मग हे थोडेसे कुरकुरित झाल्यावर एक प्लेट मध्ये काढून लोणचे आणि दह्या सोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळाची नाळ महत्वाची का आहे? नाळ जपून का ठेवायची जाणून घ्या