Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Valentine's Day Recipe : डेलिशियस स्ट्रॉबेरी केक

Valentine's Day Recipe : डेलिशियस स्ट्रॉबेरी केक
, गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (15:47 IST)
Valentine's Day Recipe- या वेलेंटाइन डे ला काही वेगळे नविन करा. जाणून घ्या एक स्पेशल केक बद्द्ल. सोप्पी रेसिपी आणि घरीच डेलिशियस स्ट्रॉबेरी केक बनवून तुमच्या जोडीदाराला करा खुश. चला जाणून घेऊ रेसिपी. 
 
साहित्य-
1 वाटी स्ट्रॉबेरी 
200 gm लोणी 
1 चमचा क्रीम 
1 वाटी दूध 
1 मोठा चमचा 
1 1/2 चमचा मैदा 
मीठ चिमुटभर 
1/2 वाटी कोको 
1 1/2 चमचा बेकिंग पावडर 
1/4 वाटी केस्टर साखर 
सजवण्यासाठी क्रीम आणि स्ट्रॉबेरी 
 
कृती-  
स्ट्रॉबेरी केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी दुधात सिरका मिक्स करा. मैदयामध्ये मीठ, कोको, बेकिंग पावडर आणि साखर टाकून ते चाळने. वितळलेले लोणी आणि सिरका मिसळलेले दूध हे मिश्रण दोन मिनिट फेटा. आता एसेंस, दूध आणि क्रीम मिक्स करून दोन मिनिट फेटा. या मिश्रणाला दोन बरोबर भागात घेऊन बटर पेपरवर लावलेल्या बेकिंग ट्रे मध्ये टाकून 180 डि.सें. तपमान वर 30 ते 35 मिनिट बेक करणे. नंतर यात सूरी टाकून बघणे जर मिश्रण सुरीला चिटकले नाही तर समजा केक तयार झाला आहे. केक थंड झाल्यानंतर त्याला काढून घ्या केकच्या एक भागाला क्रीम लावा त्यावर तुमच्या आवाडीनुसार कापलेली स्ट्रॉबेरी सजवा. केकचा दूसरा भाग यावर ठेवणे. क्रीम आणि स्ट्रॉबेरीने केकच्या दुसऱ्या भागाला सजवून स्ट्रॉबेरी कोको केक वेलेंटाइन डे स्पेशल तुमच्या जोडीदाराला दया.  

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पपईच नाही तर पपईच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या सात फायदे