Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

Ghevda Vegetable
, बुधवार, 11 डिसेंबर 2024 (16:00 IST)
साहित्य- 
दोन- बटाटे 
दोन- हिरव्या मिरच्या (तुकडे केलेले) 
दोन चमचे- खोबऱ्याचा किस 
एक काडी-कढीपत्ता 
तेल
हिंग
मोहरी 
जिरे 
अर्धा चमचा-हळद 
अर्धा चमचा-तिखट 
अर्धा चमचा-गोडा मसाला
एक चमचा-गरम मसाला
चवीनुसार मीठ  
कोथिंबीर 
पाणी 
 
कृती-
सर्वात आधी घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्याव्या. तसेच हातानेच या शेंगांचे छोटे छोटे तुकडे करायचे. तसेच सुरीने देखील कापू शकता पण घेवड्याच्या शेंगा हाताने तुडल्याने भाजीची चव चांगली लागते. आता सर्व तुकडे पाण्यात भिजत घालावे. नंतर कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद घालावी. आता मिरची तुकडे घालून परतवून घ्यावे.तसेच तिखट आणि गोडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता बटाटा काप घालावे. व आता शेंगांचे तुकडे घालून परतवून घ्यावे. व थोडावेळ झाकून ठेवावे. नंतर चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालावे जेणेकरून वाफेने शेंगा शिजतील. आता यामध्ये चवीनुसार साखर किंवा गूळ घालावा. तसेच खोबरे किस आणि गरम मसाला घालावा व वरून कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली दत्तगुरुंना आवडणारी घेवड्याची भाजी, नैवेद्यात देखील ठेऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झटपट तयार होणारी रेसिपी चिकन टिक्का