Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात बनवा चविष्ट देशी तडक्याचे मटार सूप

हिवाळ्यात बनवा चविष्ट देशी तडक्याचे मटार सूप
, गुरूवार, 27 जानेवारी 2022 (12:34 IST)
हिवाळ्यात सूप प्यायचा मजाच काही और आहे .वेगवेगळ्या भाज्या आणि डाळीच्या पराठ्यांसह भाजीचे सूप आवडतात. आपल्याला देखील सूप पिण्याची आवड असल्यास बाजारातील पाकिटाच्या सूपऐवजी घरी सूप बनवा. नाश्त्यात सूप प्यायल्याने वजन तर कमी होतेच शिवाय शरीरात उष्णताही येते. आज आम्ही मटार सूप ची रेसिपी सांगत आहोत . मटार सूपमधील पोटॅशियम  रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्त दाब आणि हृदयविकारावर फायदा होतो. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन-के हाडांना  मजबूत बनवते. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
 साहित्य -
2 कप मटार (उकडलेले
2 कप (उकडलेले पालक
1 कांदा (बारीक चिरून))
4 पाकळ्या लसूण 
1 लहान आल्याचा तुकडा 
2 हिरव्या मिरच्या
1/2 टिस्पून जिरे 
2 तेजपान किंवा तमालपत्र  
1 वेलची 
1 तुकडा दालचिनी
चवीनुसार मीठ 
आवश्यकतेनुसार तेल 
क्रीम गार्निशसाठी 
 
कृती-
सर्वप्रथम ग्राइंडरच्या भांड्यात आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार करा. हिरवे मटार आणि पालक सुद्धा बारीक करून प्युरी बनवा. कढईत तेल मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, वेलची, दालचिनी आणि तमालपत्र टाकून परतून घ्या. जिरे तडतडताच कांदे घालून परतून घ्या. कांदे परतून आलं -लसूण पेस्ट घालून परतून घ्या. यानंतर मटार आणि पालकाची तयार प्युरी घाला आणि पाच मिनिटे शिजवा. आवश्यकतेनुसार  मीठ आणि पाणी घाला. 2-4 मिनिटे उकळवा आणि गॅस बंद करा. मटारसूप तयार आहे. क्रीमने सजवून सर्व्ह करा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिभेचा काळा रंग असू शकतो धोकादायक, जिभेच्या रंगावरून जाणून घ्या तुमच्या आरोग्याची स्थिती