Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Instant Mango Pickle Recipe इन्स्टंट आंबा लोणचे रेसिपी

Instant Mango Pickle Recipe इन्स्टंट आंबा लोणचे रेसिपी
, सोमवार, 28 जून 2021 (11:09 IST)
जेव्हा जेवण्याचया ताटात लोणचीबद्दल बोललं जातं तर आंब्याचे लोणचं हे अनेकांची पसंती असते. आंब्याच्या लोणचीची चव अजून वाढते जेव्हा ती घरातील आजी त्यांच्या पारंपारिक पद्धतीने तयार करते. आपल्यालाही आजीच्या हाताची चव मिळत नसली तरी चविष्ट रेसिपी स्वत: तयार करु शकता. चला इन्स्टंट आंब्याचे लोणचं कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
 
कच्चा आंबा - 2 कप, कोरडी लाल मिरची - १, चिरलेला कढीपत्ता - मूठभर, हिंग - १/२ टीस्पून, मीठ - चवीनुसार, तेल- १/२ कप, मोहरी - 1 टेस्पून, लसूण - 10- 15 कळ्या, काश्मिरी मिरची पावडर - १/२ टीस्पून.
 
इन्स्टंट आंबा लोणचे बनवण्यासाठी प्रथम आंबा धुवून आणि पुसून घ्यावा. नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि कोरड्या ला‍ल मिरच्या घाला. आता कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घालून हालवून घ्या. हिंग, तिखट आणि मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात कैरीच्या फोडी घाला आणि तीन मिनिटे शिजवा. तुमचं इंस्टंट लोणचं तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फक्त 4 तासात कोलेस्ट्रॉल कमी करतं हे फळ, कसे ते जाणून घ्या