suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kids Favourite झटपट, चविष्ट आणि डब्यासाठी परफेक्ट रेसिपी भरली चपाती

Stuffed Chapati
भरली चपाती ही झटपट, चविष्ट आणि डब्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये नक्कीच देऊ शकतात. 
 
साहित्य-
गव्हाचं पीठ – 2 कप
मीठ – चिमूटभर
पाणी – लागेल तसं
 
स्टफिंग
उकडलेले बटाटे – 2
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – 1-2
हळद – 1/2 टीस्पून
तिखट – 1 टीस्पून
गरम मसाला – 1/2 टीस्पून
कोथिंबीर – थोडी
मीठ – चवीनुसार
ALSO READ: टिफिन मध्ये देता येईल ओट्स पासून बनलेला चविष्ट पदार्थ, जाणून घ्या रेसीपी
कृती-
 सर्वात आधी पीठ मळून घ्या.  गव्हाचं पीठ, मीठ आणि पाणी घालून मऊ कणिक मळा 10–15 मिनिटं झाकून ठेवा आता स्टफिंग तयार करण्यासाठी बटाटे मॅश करा. त्यात कांदा, मिरची, मसाले, मीठ आणि कोथिंबीर मिसळा. आता कणकेचा गोळा घ्या आणि थोडा लाटून घ्या मध्ये स्टफिंग ठेवा आणि व्यवस्थित बंद करा, हलक्या हाताने लाटून तव्यावर भाजा दोन्ही बाजूंनी तेल/तूप लावून सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. तर चला तयार आहे आपली  भरली चपाती रेसिपी,  दही, लोणचं किंवा बटरसोबत  नक्कीच टिफिनमध्ये द्या. तुम्ही पनीर स्टफिंग,  मिक्स व्हेज स्टफिंग देखील ट्राय  करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाणी प्यायल्यानंतरही तुमचा घसा सतत कोरडा पडतो का? हे या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते