Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kitchen Hacks:पाणीपुरीसाठी आंबट आणि मसालेदार पाणी 5 मिनिटात तयार करा

Kitchen Hacks:पाणीपुरीसाठी आंबट आणि मसालेदार पाणी 5 मिनिटात तयार करा
, शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (12:59 IST)
पाणीपुरीचे नाव ऐकताच तोंडाला पाणी येते. काहींना त्याचे पाणी पाणीपुरी पेक्षा जास्त आवडते. तसे, पाणीपुरीचे पाणी चांगले नसेल तर खायला मजा येत नाही. जर आपल्याला बाजारातील पाणीपुरी चे पाणी आवडत नसेल तर आपण घरीही सहज पाणी तयार करू शकता. आपण घरीच पाणीपुरी बनवू शकता आणि चिंचेच्या पाण्याने पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता. गोलगप्पाचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पोट साफ होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. या पाण्यात हिंग आणि पुदिना टाकून प्यायल्याने गॅसच्या समस्येतही आराम मिळतो. चला जाणून घेऊया पाणीपुरीचे पाणी कसे बनवायचे. 
 
 
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी साहित्य
1 कप कोथिंबीर
 
1/2कप पुदिन्याची पाने
 
2 टीस्पून हिरवी मिरची
 
1 कप पालक 
 
1 कप चिंचेचे पाणी किंवा आमसूल पूड 
 
1/2 टीस्पून सुंठ पावडर
 
1/2 टीस्पून भाजलेले जिरे
 
1/2 टीस्पून लाल तिखट
 
2 अक्ख्या लाल मिरच्या
 
1 टीस्पून चाट मसाला
 
1/4 कप भिजवलेली बुंदी
 
1/2 लिंबू
 
1/4 टीस्पून हिंग
 
चवीनुसार काळी मिरी
 
1/2 चमचे पांढरे मीठ
 
1/2 टीस्पून काळे मीठ
 
 
पाणीपुरीच्या पाण्याची रेसिपी
 गोलगप्पा पाणी बनवण्यासाठी पुदिना, पालक, धणे, सुंठ, हिरवी मिरची, लाल मिरच्या एकत्र बारीक करून घ्या.
 आता पाण्यात भाजलेले जिरे, काळे मीठ, लाल तिखट, काळी मिरी, हिंग, पांढरे मीठ आणि चाट मसाला टाका.  आता साधारण अर्धा लिंबू पाण्यात टाका.
आता चिंचेचे पाणी गाळून घ्या किंवा आमसूल पूड  टाकून पाणी गाळून घ्या.
 या पाण्यात भिजवलेली बुंदी घालून सर्व गोष्टी नीट मिक्स करा.
तयार आहे चविष्ट आंबट-गोड पाणीपुरीचे पाणी.आपण पाणीपुरीच्या आस्वाद घेत खा. किंवा पाणी प्या.हे पोटासाठी फायदेशीर आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वंध्यत्वाशी सामना - पुरुष देखील तितकेच जबाबदार