Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Methi Matar Malai recipe : चविष्ट आणि सोपी मेथी मटार मलाई भाजी रेसिपी जाणून घ्या

methi chi patal bhaji
रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (15:24 IST)
हिवाळ्यात अनेक हंगामी भाज्या बाजारात येतात. या ऋतूत जेवणाची चवही स्वादिष्ट लागते. विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि लोक या हंगामी पदार्थांचा आस्वाद घेतात. हिवाळ्याच्या हंगामात अनेक प्रकारच्या भाज्या बाजारात पाहायला मिळतात. फुलकोबी, गाजर, वाटाणा यांसह या हंगामी भाज्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची चव वाढवतात. यातील हिरवे वाटाणे हिवाळ्यात भरपूर वापरले जातात. नाश्त्यात हिरव्या वाटाण्यापासून बनवलेल्या पदार्थांपासून ते दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात विविध प्रकारच्या हिरव्या वाटाण्यांच्या भाज्या बनवल्या जातात. या हंगामात मेथीही बाजारात उपलब्ध आहे.मेथी घालून स्वादिष्ट आणि सोपी मेथी मटार मलईची भाजी घरीच बनवा साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य :
दीड वाटी हिरवे वाटाणे, दोन वाट्या चिरलेली मेथीची भाजी , अर्धा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, अर्धा इंच आल्याचा तुकडा,दालचिनी, वेलची ,काजूचे तुकडे, हिरवी मिरची, दोन चमचे मलई, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी पाणी, मीठ, तेल.
 
कृती-
सर्वप्रथम कढईत एक चमचा तेल गरम करा. त्यात वेलची, दालचिनी आणि चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
कांदे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या, नंतर त्यात लसूण, आले, हिरवी मिरची आणि काजू घालून दोन मिनिटे परतून घ्या.
आता गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर भाजलेले मसाले मिक्सर मध्ये वाटून  त्याची पेस्ट बनवा.
आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल मध्यम आचेवर गरम करा आणि तेल आणि मसाले वेगळे होईपर्यंत मसाल्याची पेस्ट परतून घ्या.
बारीक चिरलेली मेथीची भाजी घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.
 या मिश्रणात मटार आणि मीठ मिसळा आणि दोन ते तीन मिनिटे शिजवा.
आता अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घाला.
 मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, नंतर ताजे मलई घाला आणि चांगले मिसळा.
 एक मिनिट शिजवल्यानंतर गॅस बंद करा. मेथी मटार मलई भाजी तयार आहे.
रोटी, पराठा बरोबर सर्व्ह करा.

Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या 'या' 11 लशींची तुम्हाला माहिती आहे का?