साहित्य
एक कप- पिवळी मूग डाळ
एक कप- तांदळाचे पीठ
अर्धा छोटा चमचा- जिरे
अर्धा छोटा चमचा- ओवा
एक छोटा चमचा- तीळ
1/4 चमचा हळद
अर्धा छोटा चमचा- तिखट
काळे मीठ
तेल
पाणी
कृती-
सर्वात आधी मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. तसेच कमीतकमी डाळ तीस मिनिट पाण्यामध्ये भिजत घालावी. आता डाळीला पाण्यामधून काढून घ्यावे व मिक्सरमधून दरीदरीत फिरवून घ्यावे. आता दळलेल्या डाळीमध्ये तांदळाचे पीठ, जिरे, ओवा, तीळ, हळद, तिखट,काळे मिठ घालावे. यानंतर यामध्ये थोडेसे तेल घालावे व हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून मळून घ्यावे. जर मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर थोडे पाणी घालावे जेणेकरून ते मऊ होईल. आता चकली मोल्ड घेऊन त्यामध्ये तयार मिश्रण भरावे. व चकल्या पाडून घ्याव्या. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार केलेल्या चकल्या तळून घ्याव्या. तर चला तयार आहे आपली झटपट मूग डाळ चकली, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik