Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थंडगार ओट्स कुल्फी रेसिपी

Oats Kulfi Recipe
, शुक्रवार, 30 मे 2025 (14:10 IST)
साहित्य-
४ चमचे साधे ओट्स 
एक हिरवी वेलची 
१० काजू, बदाम 
मनुके 
२ कप टोन्ड दुध
कृती-
सर्वात आधी साधे ओट्स,वेलची आणि काजू, बदाम आणि मनुके मिक्सरमध्ये घालून चांगले बारीक करावे.आता दुधात चिमूटभर केशर भिजवावे. एका भांड्यात ओट्स-वेलची-ड्रायफ्रूट्स पावडर आणि केशर दूध घ्या आणि नंतर सर्वकाही चांगले मिसळा. हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. हे मिश्रण सुमारे ३ मिनिटे उकळू द्या.आता या मिश्रणात एक चमचा गूळ आणि ३ चमचे मध घाला आणि मिक्स करा. आता हे मिश्रण थोडे घट्ट होऊ द्या. ओट्स कुल्फीमध्ये काही केशराचे धागे आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालावे. यानंतर कुल्फीचे मिश्रण थंड झाल्यावर ते कुल्फीच्या साच्यात ठेवा. आता तुम्ही ओट्स कुल्फी ६-९ तास फ्रीजरमध्ये गोठवण्यासाठी ठेवावी.आता फ्रिज मधून बाहेर काढून सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Baby Girl Names Inspired by Queens of India तुमच्या मुलीचे नाव भारताच्या महान राण्यांच्या नावावर ठेवा