rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यदायी चविष्ट दुधी भोपळ्याचा रायता

bottle gourd raita
, गुरूवार, 29 मे 2025 (08:00 IST)
साहित्य-
दुधी भोपळ्याचा किस - एक कप
दही - १.५ कप  
मीठ - चवीनुसार
भाजलेले जिरे पावडर -अर्धा टीस्पून
काळी मिरी पावडर - १/४टीस्पून
हिरवी मिरची - एक 
कोथिंबीर 
ALSO READ: Beetroot Raita आरोग्यसाठी फायदेशीर आहे बीटाचा रायता
कृती- 
सर्वात आधी दुधी भोपळ्यचा किस पाण्यात उकळवावा . तुम्हाला ते फक्त २ ते ३ मिनिटे उकळावे लागेल. आता थंड दही फेटून घ्या. यानंतर, दुधी भोपळ्याचा किस  हाताने पिळून त्याचे पाणी काढा. ते चांगले पिळून झाल्यावर, फेटलेल्या दह्यात घाला, मीठ, भाजलेले जिरे आणि काळी मिरी घाला आणि मिक्स करा. चव वाढवण्यासाठी, तुम्ही वर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या देखील घालू शकता. तर चला तयार आहे आपले दुधी भोपळ्याचे रायते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या 6 प्रकारच्या लोकांनी आंबा खाऊ नये, जाणून घ्या धक्कादायक कारण