साहित्य-
अननस - ४१० ग्रॅम
केशर - १/८ चमचा
पाणी - एक टेबलस्पून
जाड दही - ४०० ग्रॅम
साखर पावडर - १७५ ग्रॅम
पिस्ता - दोन टेबलस्पून
चेरी
कृती-
सर्वात आधी अननस घेऊन आणि त्याचे लहान तुकडे करा. आता एका भांड्यात केशर, पाणी घालून ३० मिनिटे भिजत ठेवा. एका भांड्यात दही, चिरलेला अननस, साखर पावडर, केशर आणि पाण्याचे मिश्रण, पिस्ता घाला आणि चांगले मिसळा. आता ते सर्व्हिंग बाऊलमध्ये घाला. व पिस्ता आणि चेरीने सजवा. तर चला तयार आहे आपले अननस श्रीखंड, थंड झाल्यावर नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik