साहित्य: 1 किलो जाड पोहे, आले-लसूण-हिरवी मिरच्यांची पेस्ट, मीठ, पाणी.
कृती : सर्वप्रथम पोहे पाण्याचे भिजवून चाळणीत निथळत ठेवावेत. पाणी पूर्णपणे निथळले की, त्या पोह्यांमध्ये मिचरी पेस्ट आणि मीठ घालून चांगले मळून घ्यावे. बारीक होण्यासाठी मिक्सरमधून काढावे. हवे असल्यास किंचित पाणी टाकावे. एकदम पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. लगेच याच्या चकल्या पाडाव्यात. या चकल्या चांगल्या सुकू द्याव्यात. नंतर त्या तळून खाव्यात.