Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाढदिवसासाठी अतिशय शाही आणि चविष्ट पर्याय रबडी गुलाब जामुन केक

Rabdi Gulab Jamun Cake
, शनिवार, 21 फेब्रुवारी 2026 (08:00 IST)
साहित्य-
व्हॅनिला किंवा मावा केक प्रीमिक्स- २ वाट्या 
दूध- गरजेनुसार
तेल किंवा लोणी- २-३ मोठे चमचे
वेलची पूड-१ छोटा चमचा
रबडी- १ वाटी (पातळसर) किंवा साखरेचा पाक.
विप्ड क्रीम-२ वाट्या
गुलाब जामुन-८-१० (मध्यम आकाराचे)
ड्राय फ्रूट्स- बदाम, पिस्त्याचे काप
केशर- थोडे दुधात भिजवलेले (ऐच्छिक)
वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या 
ALSO READ: Mawa Cake Recipe : खव्यापासून बनवा चविष्ट केक
कृती-
सर्वात आधी व्हॅनिला केक प्रीमिक्समध्ये दूध, तेल आणि वेलची पूड घालून स्मूथ मिश्रण तयार करा. हे मिश्रण ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये ओता आणि १८०°C वर ३०-३५ मिनिटे बेक करा  आता केक पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्याचे दोन किंवा तीन आडवे थर  करा. आता विप्ड क्रीममध्ये थोडी वेलची पूड आणि केशरचे दूध घालून घट्ट होईपर्यंत फेटून घ्या. आता केकचा पहिला थर ठेवा. त्याला थोड्या पातळ रबडीने किंवा गुलाब जामुनच्या पाकाने ओले करा. त्यावर विप्ड क्रीमचा थर द्या. या थरामध्ये काही गुलाब जामुनचे छोटे तुकडे मधून मधून ठेवा याचप्रमाणे दुसरा आणि तिसरा थर लावून घ्या. आता संपूर्ण केकला क्रीमने कव्हर करा. केकच्या वरच्या बाजूने अखंड किंवा अर्धे कापलेले गुलाब जामुन आकर्षकरीत्या मांडा. मधल्या भागात पिस्त्याचे काप, बदाम आणि गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या टाकून सजावट करा. बाजूने रबडीचे थोडे ड्रिपिंग केल्यास केक अधिक सुंदर दिसतो. चव वाढवण्यासाठी तुम्ही विप्ड क्रीमच्या ऐवजी लेयर्समध्ये घट्ट रबडीचा वापर केलात तर चव अधिक नैसर्गिक लागते.  हा केक तयार झाल्यावर किमान २-३ तास फ्रिजमध्ये ठेवा, जेणेकरून रबडी आणि क्रीम केकच्या स्पंजमध्ये नीट मुरेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दररोज फक्त 7000 पावले चाला, या गंभीर आरोग्य समस्या कमी होतील