Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rava Upma वजन कमी करण्यात मदत करेल पौष्टिक रवा उपमा

rava upma
जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी हलके आणि चवदार बनवायचे असेल तर तुम्ही रवा उपमा ट्राय करू शकता. रवा उपमा चवदार आणि आरोग्यासाठी उत्तम नाश्ता आहे. रवा उपमा बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. असे केल्याने रवा उपमा स्वादिष्ट बनतो. रवा उपमा बनवण्याची रेसिपी जाणून घ्या- 
 
साहित्य- 
एक कप रवा, 2 चमचे उडीद डाळ, एक कांदा बारीक चिरून, एक सिमला मिरची बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक कप भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेले आले एक चमचा, कप गाजर बारीक चिरलेला, अर्धा वाटी मटार, अर्धा चमचा मोहरी, 5 कढीपत्ता, मीठ, तेल
 
कृती- 
रवा उपमा बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्ता घाला. यानंतर उडीद डाळ घालून एक मिनिट परतून घ्या. यानंतर कांदा आणि आले घालावे. हे सोनेरी होईपर्यंत परतून घ्या, आता मटार, गाजर, सिमली मिरची, मिरची आणि शेंगदाणे आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर ते 5 मिनिटे शिजवा. नंतर कढईत गरम पाणी घाला. आता त्यात रवा घालून मंद आचेवर शिजवा. हे पाणी पूर्णपणे आटून रवा फुगल्यावर गॅस बंद करा. अशा प्रकारे उपमा तयार आहे. आता कोथिंबीरीने सजवा आणि गरम गरम सर्व्ह करा.
 
खास टिप्स- 
उपमा बनण्यापूर्वी रवा चांगला भाजून घ्या. 
आपण आपल्या आवडीप्रमाणे मोहर्‍याऐवजी जिरे घालू शकता.
भाज्या चांगल्या परतून आणि शिजून घ्या.
रवा ब्राऊन होऊपर्यंत भाजू नये. तो पांढरा ठेवा.
उपमा बनवताना सतत ढवळत राहा.
आपण आधी रवा आणि नंतर हालवत हालवत पाणी देखील घालू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Breast Pain मासिक पाळीपूर्वी स्तनांमध्ये वेदना का होतात? जाणून घ्या उपाय