आपण बटाटा, कोबी आणि मुळ्याचे पराठे तर बऱ्याच वेळा तर खालले असतील, पण आपण कधी रवा आणि बटाट्याचे पराठे खालले आहेत का? जर नाही तर आता बनवून बघा. मुलांपासून मोठ्यांना देखील हे पराठे आवडतील आणि हे बनवायला देखील सोपे आहेत चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.
साहित्य-
1 वाटी रवा, 3 -4 उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे, 2 चमचे कोथिंबीर चिरलेली, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ, गरजे प्रमाणे तेल.
कृती -
हे पराठे बनविण्यासाठी गरम पाणी वापरावे. पाककला तज्ञांच्यामते, रवा गरम पाण्यात फुगतो ज्यामुळे पराठे चांगले बनतात. एका पॅन मध्ये एक वाटी पाणी गरम करून घ्या. या मध्ये चवीप्रमाणे मीठ,एक चमचा तेल, हळद, जिरेपूड आणि हिरवी मिरची घाला. रवा घालून मिसळून घ्या. रवा चांगल्या प्रकारे शिजल्यावर कुस्करलेले बटाटे घालून मिसळा हे मिश्रण कणकेच्या प्रमाणे असावे. आंचेवरून काढून थंड करा. लक्षात ठेवा की हे मिश्रण जास्त थंड करावयाचे नाही.
या मिश्रणाला कोथिंबीर आणि एक चमचा तेल घालून चांगल्या प्रकारे कणीक सारखे मळून घ्या आणि ह्याचे गोळे बनवा आणि कोरडे पीठ लावून पोळी सारखे लाटून घ्या, पण पोळी सारखे पातळ न लाटला थोडं जाडसर ठेवा. आता तवा गरम करून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने शेकून घ्या. हे मध्यम आचेवरच शेकायचे आहे, नाही तर पराठे जळतील.गरम पराठे दही सह किंवा चटणीसह सर्व्ह करा आणि चविष्ट पराठ्यांचा आस्वाद घ्या.