जेवण्यात रायता असल्यास जेवण्याचा स्वाद दुप्पट होतो. घरात भोपळ्याचे रायते तयार करणे अगदी सोपे आहे. जाणून घ्या स्वादिष्ट भोपळा रायता तयार करण्याची कृती-
सामुग्री-
भोपळा- 200 ग्राम
दही- 350 ग्राम
तिखट-चवीप्रमाणे
जीरा पावडर- 1/2 चमचा
कोथिंबीर-बारीक चिरलेली
मीठ- चवीप्रमाणे
तेल- 2 चमचे
कृती
सबसे आधी भोपळा सोलून त्यातील बिया काढून किसून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करा.
यात भोपळा आणि मीठ घाला.
तीन-चार मिनिट शिजू घ्या.
नंतर गॅस बंद करुन हे गार होऊ द्या.
आता एका भांड्यात दही, मीठ, जीरपूड, कोथिंबीर टाकून मिसळून घ्या.
यात शिजलेला भोपळा घाला.
गार सर्व्ह करा.