Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rice Tikki Recipe : घरी बनवा भाताची टिक्की, रेसिपी जाणून घ्या

aloo tikki
, सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (22:17 IST)
Rice Tikki Recipe :चाट चे  नाव घेतल्यावर लगेच तोंडाला पाणी येत. पाणी पुरी, आलू टिक्की हे सर्वांनाच आवडते. टिक्कीची चव इतकी रुचकर असते की ती एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.आपण नेहमी आलूची टिक्की खातो पण कधी भाताची टिक्की खालली आहे का. आपण घरी भाताची टिक्की बनवून बघा हे नक्कीच आवडेल. चला तर मग भाताची टिक्की कशी करायची जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
 
तांदूळ - 1 कप (उकडलेले)
बटाटे  - 2 (उकडलेले)
मैदा - 2 चमचे
सिमला मिरची - 1 (चिरलेली )
हिरव्या मिरच्या  - 2 चमचे  (चिरलेली)
कांदा - 1 (चिरलेला)
वाटाणे - 1/2 कप (उकडलेले)
कोथिंबीर - 2 चमचे
चाट मसाला - 1 टीस्पून
लाल तिखट - 1 टीस्पून
मीठ - चवीनुसार
तेल - टिक्की तळण्यासाठी
 
कृती- 
एका भांड्यात उकडलेले तांदूळ, मॅश केलेले बटाटे, 2 चमचे मैदा, 1 चमचे लाल तिखट , 1 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार मीठ, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेली शिमला मिरची, 2 चमचा कोथिंबीर, अर्धी वाटी मटार इ. सर्व साहित्य एकत्र करा. 
त्यात थोडं पाणी घालून टिक्कीसाठी पीठ तयार करा. 
 गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा आणि तांदूळ मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवून बारीक वाटून घ्या. 
तेल गरम झाल्यावर पिठा पासून गोल आकाराच्या टिक्की तयार करून तेलात टाका. नंतर दोन्ही बाजूंनी हलके तळून घ्या आणि टिक्की कुरकुरीत होईपर्यंत तळा. 
टिक्की कुरकुरीत झाल्यावर गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घ्या. वरून कोथिंबीर  शिंपडा आणि हिरवी चटणी , दही आणि सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा  
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता कशी ओळखावी