Publish Date: Sat, 07 Feb 2026 (08:00 IST)
Updated Date: Thu, 05 Feb 2026 (20:24 IST)
'रोज डे' निमित्त गुलाबाचा सुवास आणि स्वाद असलेल्या या ३ खास रेसिपी तुमच्या सेलिब्रेशनमध्ये नक्कीच गोडवा वाढवतील. या रेसिपी दिसायला जितक्या सुंदर आहे, तितक्याच बनवायला सोप्या आहे.
१. रोज गुलकंद मिल्कशेक
साहित्य
२ कप थंड दूध
२ मोठे चमचे रोज सिरप
१ मोठा चमचा गुलकंद
व्हॅनिला आईस्क्रीम (ऐच्छिक)
कृती-
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात दूध, रोज सिरप आणि गुलकंद एकत्र करून फिरवून घ्या. ग्लासमध्ये ओतण्यापूर्वी ग्लासच्या कडेने थोडे रोज सिरप सोडा. वरून गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि ड्रायफ्रूट्स टाकून थंडगार सर्व्ह करा. हा एक थंडगार आणि रिफ्रेशिंग पर्याय आहे.
२. इन्स्टंट रोज नारळ लाडू
साहित्य-
१.५ कप ओले किंवा सुके खोबरे (किस)
१/२ कप कंडेन्स्ड मिल्क
२ चमचे रोज सिरप
थोडे तूप
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करून खोबऱ्याचा कीस २ मिनिटे परतून घ्या. त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि रोज सिरप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण कोमट असतानाच त्याचे छोटे लाडू वळा आणि सुक्या खोबऱ्यात घोळवून घ्या. वरून गुलाबाची एक पाकळी लावून सजवा. ह्या मिठाईचा गुलाबी रंग पाहता क्षणी मनाला मोहवून टाकतो.
३. रोज गुलकंद मूस
साहित्य-
व्हिप्ड क्रीम १ कप
गुलकंद २ मोठे चमचे
रोज सिरप २ मोठे चमचे
दूध २-३ चमचे
गुलाबाची फुले/पाकळ्या
बदाम-पिस्त्याचे काप
कृती-
सर्वात एका बाऊलमध्ये थंड व्हिप्ड क्रीम घ्या आणि ती घट्ट होईपर्यंत इलेक्ट्रिक बीटरने फेटून घ्या. एका छोट्या वाटीत २ चमचे गुलकंद आणि थोडे दूध एकत्र करून पेस्ट बनवून घ्या, जेणेकरून तो क्रीममध्ये नीट मिसळला जाईल. फेटलेल्या क्रीममध्ये गुलकंदाची पेस्ट आणि २ चमचे रोज सिरप घाला. चमच्याने हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून क्रीमचा हलका गुलाबी रंग येईल. हे तयार मिश्रण काचेच्या ग्लासात किंवा बाऊलमध्ये काढा. वरून पुन्हा थोडे रोज सिरप डिझाईनसाठी टाकू शकता. हे मूस किमान १ ते २ तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी वरून सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप टाकून सजवा. हे बनवायला अतिशय सोपे आहे आणि दिसायला खूपच प्रीमियम वाटते. या रेसिपींमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केल्यास स्वाद अधिक नैसर्गिक आणि छान येतो. तसेच सजावटीसाठी तुम्ही वाळलेल्या गुलाबाच्या कळ्या देखील वापरू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik