Publish Date: Thu, 05 Feb 2026 (08:00 IST)
Updated Date: Wed, 04 Feb 2026 (15:49 IST)
साहित्य-
मैदा- १ कप किंवा गव्हाचे पीठ)
पिठीसाखर- २ ते ३ मोठे चमचे
बेकिंग पावडर- १ छोटा चमचा
मीठ-चिमूटभर
दूध- ३/४ कप
अर्धा कप- दही
बटर -२ मोठे चमचे
व्हॅनिला एसेन्स-अर्धा छोटा चमचा
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. दुसऱ्या बाऊलमध्ये दूध, दही, वितळलेले लोणी आणि व्हॅनिला एसेन्स नीट मिसळून घ्या. आता कोरड्या साहित्यात हे ओले साहित्य घालून गुठळ्या होणार नाहीत असे स्मूथ बॅटर तयार करा. गॅसवर नॉन-स्टिक पॅन गरम करा. त्यावर थोडे लोणी लावा. हार्ट शेपचा 'कुकी कटर' किंवा 'मोल्ड' पॅनवर ठेवा आणि त्यामध्ये बॅटर ओता. पॅनकेक एका बाजूने भाजला की मोल्ड काढून पॅनकेक उलटून दुसरी बाजू भाजून घ्या. आता बॅटर एका स्क्वीझ बॉटल मध्ये भरा. पॅनवर बॅटरने आधी हृदयाची बाह्यरेखा काढा आणि मग मध्यभागी बॅटर भरून पूर्ण हार्ट तयार करा. मध्यम आचेवर पॅनकेकच्या वरच्या बाजूला बुडबुडे येऊ लागले की तो सावकाश उलटवा. दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. वर थोडी पिठीसाखर भुरभुरा किंवा व्हिप्ड क्रीम वापरा. व तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik