Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 श्री गजानन महाराजांचे आवडते नैवेद्य पाककृती

recipes
, रविवार, 8 फेब्रुवारी 2026 (08:18 IST)
शेगावचे श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जागृत दैवत मानले जातात. महाराजांच्या भक्तगणांसाठी त्यांचे नैवेद्य केवळ अन्न नसून तो एक मोठा आशीर्वाद मानला जातो. आज आपण श्री गजानन महाराजांना प्रामुख्याने आवडणारे नैवेद्य पाहणार आहोत जे त्यांना अत्यंत प्रिय आहे 
 
पिठलं-भाकरी (झुणका-भाकर)
महाराजांना अत्यंत साधा आहार आवडत असे. ते जेव्हा शेगावात प्रकट झाले आणि  भक्ताने दिलेले पिठलं आणि ज्वारीची भाकरी त्यांनी अत्यंत आवडीने ग्रहण केली. आजही शेगावला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाप्रसाद म्हणून पिठलं-भाकरी दिली जाते.
थोडक्यात कृती-
ज्वारीची भाकरी-
सर्वात आधी ताजे ज्वारीचे पीठ घ्यावे. आता त्यात चवीपुरता मीठ घालून मिक्स करावे. आता कोमट पाणी पिठामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात घालावे व मऊ असा गोळा तयार करावा. आता परातीत किंवा पोळपाटावर म्हणजे तुम्हाला सोपे जाईल अशी भाकरी थापून घ्यावी. आता तयार भाकरी तवा गरम करून तव्यावर टाकावी व वरून थोडेसे पाणी फिरवावे, पाणी संपूर्ण भाकरीवर फिरावे. आता काही वेळा नंतर भाकरी पलटवावी. अश्याप्रकारे दोन्ही बाजूंनी भाकरी शेकून घ्यावी. आता तयार भाकरीवर तुपाचा किंवा लोण्याचा गोळा पसरवावा. तर चला तयार आहे आपली ज्वारीची भाकरी रेसिपी. 
 
झुणका-
सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. आता त्यात जिरे आणि हिंग घालावा. तसेच आता आले पेस्ट, हिरवी मिरची तुकडे, लसूण तुकडे आणि बारीक चिरलेले कांदे घालावे व आता मध्यम आचेवर पाच मिनिट परतवून घ्यावे.  नंतर हळद, बेसन आणि मीठ घालून ढवळून घ्यावे व शिजवावे. तसेच दीड कप गरम पाणी घालून एकदा हलवून आता झाकण ठेवावे. साधारण तीन ते चार मिनिट मंद आचेवर शिजवावे. जेणेकरून त्यातील पाणी आटेल. व झुणका  छान मोकळा असा होईल. आता कोथिंबीर गार्निश करावी. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, लसूण, कढीपत्ता, तिखट घालावे व झुणक्याला छान अशी फोडणी द्यावी. 
 
पिठलं-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये पाणी घ्यावे, त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून घ्यावे. घट्ट करून नये. साधारण पातळ मिश्रण करावे. आता एक कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जिरे घालावे. आता आले लसूण पेस्ट व हिंग घालावे. आता कढीपत्ता व मिरचीचे तुकडे घालावे. आता नंतर हळद, तिखट, धणेपूड घालावी यानंतर तयार बॅटर घालावे व ढवळून घ्यावे. व झाकण ठेवावे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोमॅटो देखील घालू शकतात. आता तयार पिठल्यावर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपले स्वादिष्ट असे पिठलं. 
 
अंबाडीची भाजी
गजानन महाराजांना अंबाडीची भाजी विशेष प्रिय होती. ही भाजी आंबट चवीची असते आणि विदर्भात ती मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. अनेक भक्त आजही महाराजांच्या नैवेद्यात आवर्जून अंबाडीची भाजी समाविष्ट करतात.
थोडक्यात कृती-
सर्वात आधी चणा डाळ, दाणे भिजत टाकून घ्यावे. आता कुकरला चिरलेली अंबाड्याची भाजी, दाणे, डाळ उकडून घ्यावी. पाणी थोडे काढावे. नंतर डाळीचे पीठ भात आणि भाजी चांगली घाटून घ्यावी. आता तेल घालून मोहरी, हिंग, हळद, लसूण घालून खमंग फोडणी करावी. लसूण तांबूस होऊ द्यावा. नंतर मीठ, मिरच्या, तिखट, गुळ घालून चांगली उकळी द्यावी. वरून कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली अंबाडीची भाजी रेसिपी. 
 
हिरव्या मिरचीचा ठेचा
पिठलं-भाकरीसोबत हिरव्या मिरच्यांचा खर्डा किंवा ठेचा महाराजांना दिला जात असे. त्यांच्या साध्या राहणीमानाला साजेशा अशा या पदार्थांचे आजही मंदिरात महत्त्व आहे.
थोडक्यात कृती-
सर्वात आधी तिखट हिरव्या मिरच्या घेऊन त्या धुवून घ्याव्या. आता एका कढईमध्ये एक टीस्पून तेल घालून मिरच्या चांगल्या प्रकारे परतवून घ्या. आता या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून वरून मीठ, जिरे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर घालावी व मिक्सरमधून जाड बारीक असे करावे. आता तयार असा ठेचा एका वाटीमध्ये काढून त्यावर तेल सोडावे, तर चाल तयार आहे आपला साधा आणि सोप्पा असा झणझणीत ठेचा.  
 
कंदा-मुळा
महाराजांच्या भोजनात कांद्याचाही समावेश असायचा. 'गण गण गणात बोते' या मंत्राचा जप करत महाराज साधेपणाने हे अन्न ग्रहण करत असत.
 
पसाभर चुरमुरे
असे म्हटले जाते की, सुरुवातीच्या काळात महाराज भक्तांनी दिलेले साधे चुरमुरे सुद्धा आवडीने खात असत.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'प्रपोज डे' निमित्त मनातील भावना व्यक्त करित या 'स्पेशल' डिश तुमच्या जोडीदारासाठी नक्की ट्राय करा