Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संक्रांति विशेष भोगीची भाजी

bhogi bhaji
, रविवार, 14 जानेवारी 2024 (15:46 IST)
आज भोगीच्या निमित्ताने आपण बनवू या भोगीची विशेष भाजी.चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
साहित्य : 2-3पातीचे कांदे, एक गाजर, एक बटाटा, 2-3 वांगी, अर्धी-पाऊण वाटी सोलाणे, थोडेसे मटाराचे दाणे, वालपापडीच्या (ऊसावरच्या) शेंगा, शेपु, लसणीची पात,कांद्याची पात, एखादा मुळ्याचा तुकडा, 2-4 फ्लॉवरचे तुरे, तीळाचं जाडसर कुट, मोहरी, धण्याची पुड, हळद, तिखट, गोडा मसाला किंवा काळा मसाला, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, गुऴ.
 
विधी : सर्वप्रथम पातीचा कांदा उभा चिरून घ्यावा. सगळ्या भाज्या चिरून-निवडून घ्याव्यात. कढईत हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यायचा. चिरलेल्या भाज्या -पात फोडणीत घालून त्यात मीठ मसाला आणि तिळाचं कुट घालून वाफ आणायची. आवडत असल्यास थोडा गुळ घालायचा.भोगीची चविष्ट भाजी खाण्यासाठी तयार. बाजरीची भाकरी सोबत सर्व्ह करा. 
 
Edited By- Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकरसंक्रांत स्पेशल गुळाची पोळी Gulachi Poli