Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चहासोबत नमकीन बिस्किट नव्हे तर सर्व्ह करा कच्च्या केळीचे लच्छे, लिहून घ्या रेसिपी

Raw Banana Benefits
, मंगळवार, 25 जून 2024 (07:00 IST)
कच्चा केळाचे नियमित सेवन आपले पाचन तंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करते. तसेच शुगर, स्थूलपणा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच संध्याकाळच्या चहा सोबत काहीतरी चटपटीत आणि चविष्ट खाण्याचे मन असेल तर नक्कीच बनवून पहा कच्चा केळाचे लच्छे. तर चला लिहून घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
सहा कच्चे केळ 
अर्धा चमचा तिखट 
1/4 चमचा काळे मीठ 
1/4 चमचा चाट मसाला 
सहा चमचे काजू 
तीन चमचे कापलेली हिरवी मिर्ची 
एक बारीक कापलेला कांदा 
एक चमचा तांदळाचे पीठ 
1/4 चिली फ्लेक्स 
एक चमचा तीळ 
तेल 
 
कृती-
कच्चा केळाचे लच्छे बनवण्यासाठी कच्चा केळाचे साल काढून मोठ्या किसणीने किसून घ्या. आता या किसाला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करा. आता पण मध्ये तेल गरम करून डीप फ्राय करावा. आता याला बटर पेपरवर टाकावे. आता परत पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये हिरवी मिर्ची, कांदा परतवून घ्यावा. मग त्यामध्ये काजू आणि तीळ घालावी. मग यामध्ये तळलेला किस घालवा वर सर्व मसाले घालून परतवावे. व गार्निश करीत कोथिंबीर  घालावी. तर चला तयार आहे आपले कच्चा केळाचे लच्छे, गरम संध्याकाळच्या चहा सोबत नक्कीच ट्राय करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वजन सोबत ब्लड शुगर देखील नियंत्रित करतो, एलोवेरा जूस जाणून घ्या फायदे