भरडा साहित्य - 1 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ,
अर्धा-अर्धा वाटी (मूग डाळ, गहू, उडीद डाळ)
चार चमचे धणे, तीन चमचे जिरे (हे सगळं जाडसर दळूण आणावे)
कृती - एका पातेल्यात भरड्याच्या प्रमाणात पाणी घेऊन त्यातच थोडं तेल टाकून उकळत ठेवा.
भरड्याचं पीठ घेऊन त्यात जाडसर वाटलेले धणे, जिरे, तीळ, ओवा तसेच मीठ, तिखट, हळद मिसळावं.
पाण्याला उकळी आली की हे सगळं मिश्रण त्यात हळूहळू टाकावं. गॅस घालवून थोडावेळ झाकून ठेवावं.
काही वेळाने पीठ हाताने व्यवस्थित कालवून त्याचे लहान गोळे करून जाडसर थापा.
मंद आचेवर तेलात खरपूस तळून घ्यावे.