Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Benefits of Simple Yoga :ही तीन सर्वात सोपी योगासने अनेक समस्यांसाठी फायदेशीर आहे

yogasana
, शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (16:30 IST)
योगासनांची सवय शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुमच्या दिनक्रमात त्यांचा समावेश करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. योग तज्ञ सांगतात की कोणत्याही वयोगटातील लोकांना दररोज योगाभ्यास करून फायदे मिळू शकतात.
 
काही योगासने शरीराला रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासह आश्चर्यकारक फायदे देतात, त्याचा नियमित सराव करावा. ही तीन अशी सोपी आसने आहेत ज्यांचा सराव केल्याने शरीराला फायदा होतो.चला तर मग जाणून घेऊ या.
 
 1 पद्मासन योग आणि त्याचे फायदे- 
 पद्मासन योगास शरीर आणि मन दोन्हीच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वात प्रभावी योगासन म्हणून ओळखले जाते. आरामशीर आसनात बसून केले जाणारे हे योगासन नितंब, घोट्या आणि गुडघे यांच्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते. या योगाचा अभ्यास मनाला शांत करण्यासाठी जागरूकता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी देखील फायदेशीर असल्याचे आढळले आहे. मासिक पाळीच्या समस्या आणि सांध्यातील समस्या दूर करण्यासाठीही या योगाचा सराव फायदेशीर ठरू शकतो.
 
2 वृक्षासन योग आणि त्याचे फायदे- 
 
वृक्षासन योगाचा नियमित सराव देखील खूप प्रभावी मानतात . वृक्षासन योग केल्याने फायदे सहज मिळू शकतात. सर्व वयोगटातील लोक हा व्यायाम करू शकतात. वृक्षासन योग किंवा ट्री पोज तुमचे पाय आणि सांधे मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय शारीरिक संतुलन सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही या योगाचा सराव फायदेशीर ठरू शकतो.
 
3 मार्जरी आसन आणि त्याचे फायदे-
मार्जरी आसन ज्याला कॅट-काउ पोज म्हणून ओळखले जाते ते देखील एक सोपा परंतु अतिशय प्रभावी योगासन असू शकते. हा एक योगासन आहे जो संतुलन सुधारण्यासाठी ओळखला जातो आणि पाठदुखी असलेल्या लोकांसाठी हा योगा फायदेशीर आहे. या योगाचा नियमित सराव केल्याने तणाव कमी होतो आणि पोटाचे अवयव निरोगी राहतात. मार्जरी आसनाचा सराव करून सर्व वयोगटातील लोक लाभ मिळवू शकतात. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिमला मिरची खा आणि निरोगी रहा