Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काही सोप्या उपयुक्त किचन टिप्स

काही सोप्या उपयुक्त किचन टिप्स
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (11:00 IST)
घरात पाहुणे येणार आहे असं समजल्यावर प्रत्येक स्त्री त्यापूर्वीची तयारी करायला लागते. जेणे करून वेळेवर तिचा गोंधळ होऊ नये.तरी ही घाई आणि गोंधळ होतो. पूर्व तयारी केली नाही तर तिचा संपूर्ण वेळ स्वयंपाकघरातच जातो आणि त्यांना पाहुण्यांसमवेत वेळच घालवता येत नाही. त्या साठी आम्ही आपल्याला स्वयंपाकघरातील काही सोप्या टिप्स सांगत आहोत.ज्यांना अवलंबवून आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि आपण आपला संपूर्ण वेळ स्वयंपाकघरात न घालवता पाहुण्यां समवेत घालू शकाल.
 
* पाहुण्यांसाठी पूर्वीपासून सफरचंद कापून ठेवत असाल तर त्यामध्ये थोडं लिंबू पिळून द्या. असं केल्यानं सफरचंदाचा रंग बदलत नाही.
 
* दररोज सकाळी कणीक मळताना संध्याकाळ साठी देखील कणीक मळून ठेवा.त्या कणकेला तेलाचा हात लावून ठेवा. या मुळे कणीक कोरडी होणार नाही आणि पोळ्यादेखील मऊ बनतील. 
 
* घरात नान बनवताना कणीक आधीच मळून फ्रीज मध्ये ठेवू शकता. कणकेला तेल लावून ठेवा ही मळलेली कणीक सुमारे 2 ते ३ दिवस चांगली राहील.
 
* नान बनवताना चव बदलण्यासाठी त्याच्या एका भागात बारीक चिरलेले लसूण मिसळा, गार्लिक नान तयार होईल.
 
* नान बनविण्यासाठी मळलेल्या या कणकेपासून आपण स्टफ्ड नान देखील बनवू शकता. 
 
* कच्च्या कैरी किंवा इतर हंगामी फळांचे स्क्वॅश बनवून ठेवा.
 
* कस्टर्ड किंवा इतर गोड पदार्थांमध्ये वापरली जाणारी जेली देखील पूर्वीपासून बनवून ठेवू शकता. लक्षात ठेवा ही जेली केवळ 3 दिवस वापरू शकता. 
 
* फ्रूट कस्टर्ड बनवून फ्रीजमध्ये ठेवा हे सुमारे 3 दिवस वापरू शकता. 
 
* गोडधोड करण्यासाठी श्रीखंड बनवू इच्छिता तर हे बनवून फ्रीज मध्ये साठवून ठेवा आणि 3 दिवस वापरा. 
 
* केक देखील पूर्वीपासून बनवून ठेवू शकता.लक्षात ठेवा की केक चांगल्या प्रकारे बॅक झालेला असावा. चांगल्या प्रकारे बॅक झालेला केक तीन ते चार दिवसां पर्यंत खराब होत नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वात मौल्यवान वस्तू