Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंच किंवा डिनरसाठी दुधी भोपळ्याचे हे दोन पदार्थ करा ट्राय, लिहून घ्या रेसिपी

Bottle Gourd
, शुक्रवार, 26 जुलै 2024 (07:50 IST)
नेहमी तेच तेच खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. महिलांना रोज काय बनवावे हा प्रश्न सतत पडत असतो. तसेच लहान मुलांना अनेक भाज्या आवडत नाही. म्हणून आज आपण पाहणार आहोत दुधीभोपळ्याचे दोन असे पदार्थ जे सर्वांना आवडतील. तसेच तुम्ही हे लंच, डिनर मध्ये देखील बनवू शकतात. तर जाणून घ्या कोणते आहे ते पदार्थ आणि लिहून घ्या रेसिपी
 
1.दुधी भोपळ्याचा पराठा 
साहित्य-
1 कप राजगिरा पीठ 
1 कप किसलेला दुधी भोपळा 
1/2 छोटा चमचा जिरे 
1/2 छोटा चमचा ओवा 
1 हिरवी मिरची बारीक कापलेली 
हिरवी कोथिंबीर 
चवीनुसार मीठ 
आवश्यकतानुसार तूप 
 
कृती-
एका बाऊलमध्ये राजगिरा पीठ चाळून घ्या. यामध्ये थोडेसे तूप जिरे, ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि किसलेला दुधी भोपळा घालावा. तुम्हाला पीठ मळतांना पाणी घालण्याची आवश्यकता असणार नाही. कारण पीठ मळताना दुधीला पाणी सुटेल. पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनिट तसेच ठेवावे. आता गोल गोल गोळे मळून त्यांचा पराठा लाटून घ्यावा. तसेच तेल किंवा तूप घालून तव्यावर शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला दुधी भोपळ्याचा पराठा. तुम्ही हा दही किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकतात.
 
2. दुधी पीनट करी 
साहित्य-
1 दुधी भोपळा 
1 कच्चे शेंगदाणे 
1 हिरवी मिरची 
1/4 छोटा चमचा तिखट 
4-5 कढी पत्ता 
1 छोटा चमचा उडीद डाळ 
1 छोटा चमचा जिरे 
1/2 छोटा चमचा हळद 
1/2 चमचा धने पूड 
1 मोठा चमचा तेल
पाणी आवश्यकतानुसार
 
कृती-
सर्वात आधी दुधीभोपळा सोलून घ्यावा त्यानंतर एका पॅनमध्ये शेंगदाणे टाकून भाजून घ्यावे. यानंतर थंड करून घ्यावे. नंतर पण गरम करून त्यामध्ये तेल घालावे. तेलामध्ये जिरे आणि उडीद डाळ घालावी. आता पॅनमध्ये कढीपत्ता घालून एक मिनिटांपर्यंत झाकून ठेवावे. आता यामध्ये मसाले घालून पाणी टाकावे व थोडवले परतवावे. दुधीचे तुकडे नरम झाल्यानंतर त्यामध्ये पीनट पाउडर आणि परत थोडे पाणी घालून परतवावे. तर चला आपली दुधी पीनट करी तयार आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इतके मला पुरे आहे