नाश्त्यामध्ये पोहे सर्वजण खातात. भारतीयांना आवडणारा पदार्थ म्हणजे पोहे. पोहे चवीला खूपछान लागतात म्हणूनच लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पोहे खूप आवडतात. तर आज आपण पोह्यांपासून बनणारा एक नवीन पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे पोह्यांचे कटलेट. तर चला जाणून घेऊ या पोह्यांपासून कटलेट कसे बनवावे. जे कुरकुरीत असतातच पण आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले असतात.
साहित्य-
पोहे-1 कप
वाफवलेला बटाटा-१
कांदा-
टोमॅटो -1/2
चाट मसाला-1/2 मोठा चमचा
तिखट- 1/2 मोठा चमचा
हिरवी कोथिंबीर
तांदळाचे पीठ-1 मोठा चमचा
तेल-
चवीनुसार मीठ
कृती-
पोह्यांचे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे स्वच्छ धुवून घ्यावे. तसेच यामधील सर्व पाणी चाळणीच्या मदतीने काढून घ्यावे. यानंतर बटाट्याचे साल काढून घ्यावे. मग टोमटो आणि कांदा बारीक चिरून घ्यावा. आता पोह्यांमध्ये कांदा, टोमॅटो, चाट मसाला, तिखट, चिविनुसार मीठ आणि कोथिंबीर घालावी. तसेच बटाटा मिक्स करून तुम्हाला आवडेल तो शेप द्या. कटलेट्स आता तांदळाच्या पिठामध्ये ठेऊन मग एक एक करून कढईमध्ये सोडा. हलका सोनेरी कलर येईसपर्यंत टाळून घ्या. तसेच गरम गरम चटणीसोबत सर्व्ह करावे. तर चला आपले पोह्यांचे कटलेट तयार आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik