Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळा स्पेशल : कुरकुरीत फणसाचे पकोडे , जाणून घ्या रेसिपी

fanas bij
, शनिवार, 13 जुलै 2024 (16:01 IST)
पावसाळा सूरज झाला आहे. सर्वांनाच चहा सोबत गरम गरम पकोडे खायला आवडतात. आता पर्यंत तुम्ही कांदा, बटाटा इतर अनेक भाज्यांचे पकोडे खाल्ले असतील. पण आज आपण पाहणार आहोत फणसाचे पकोडे. फणसामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर चला झटपट बनणारे चविष्ट फणसाचे पकोडे रेसिपी लिहून घ्या.
 
साहित्य-
200 ग्रॅम फणसाचे बीज 
2 चमचे बेसन 
अर्धा चमचा लाल तिखट 
अर्धा चमचा आमचुर पावडर 
अर्धा चमचा हळद 
चवीनुसार मीठ 
 
कृती-
फणसाचे बीज फणसातून वेगळे करून कुकरमध्ये उकळवून घेऊन थंड करावे. वाफवलेल्या फणसाच्या बीज चे कव्हर काढून दोन तुकडे करावे. आता यामध्ये मीठ, हळद, तिखट, बेसन, आमचूर पावडर, तिखट घालून मिक्स करावे. आता एक कढई ठेऊन त्यामध्ये तेल गरम करावे. आता यामध्ये पकोडे तळून घ्यावे. कुरकुरीत होइसपर्यंत तळावे. मग यावर चाट मसाला टाकून गरम सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्वचेसंबंधित समस्या दूर करते हे तेल, जाणून घ्या याचे फायदे