rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vegetable Upma Recipe सकाळी नाश्त्यासाठी उत्तम आरोग्यदायी रेसिपी

Vegetable Upma
उन्हाळ्यात किंवा गडबडीच्या वेळी झटपट होणारा आणि पोटभरीचा नाश्ता म्हणजे 'व्हेजिटेबल उपमा' होय. मऊ आणि सुटसुटीत होण्यासाठी काही खास टिप्ससह ही रेसिपी जाणून घ्या.. 
साहित्य-
रवा: १ वाटी  
पाणी: अडीच ते ३ वाट्या 
भाज्या: बारीक चिरलेला कांदा, गाजर, मटार, बीन्स आणि स्वीट कॉर्न
फोडणीसाठी: तेल किंवा तूप, मोहरी, जिरे, कढीपत्ता, उडीद डाळ 
आल्याचा किस, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू आणि मीठ.
कृती-
सर्वात आधी एका कढईत १ चमचा तूप किंवा तेल घालून रवा मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. रवा जास्त लाल करू नका, फक्त खमंग भाजून एका ताटात काढून ठेवा.आता त्याच कढईत २ मोठे चमचे तेल/तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, उडीद डाळ आणि कढीपत्ता घालून तडतडू द्या.  आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, किसलेले आले आणि कांदा घालून परता. कांदा मऊ झाला की त्यात गाजर, मटार आणि इतर भाज्या घालून २-३ मिनिटे वाफवून घ्या. भाज्या शिजत आल्या की त्यात ३ वाट्या कडकडीत गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर टाका. पाण्याचा अंदाज 1:3 (१ वाटी रवा : ३ वाट्या पाणी) ठेवल्यास उपमा छान मऊ होतो.
पाण्याला चांगली उकळी आली की, भाजलेला रवा हळूहळू एका हाताने ओता आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. आता गॅसची आच मंद करा आणि कढईवर झाकण ठेवून २-३ मिनिटे छान वाफ येऊ द्या. शेवटी वरून लिंबू पिळा आणि भरपूर कोथिंबीर टाका.
उपमा परफेक्ट होण्यासाठी टिप्स 
गरम पाणी: नेहमी गरम पाण्याचाच वापर करा, यामुळे रवा व्यवस्थित फुलतो आणि उपमा चिवट होत नाही.
तूप: उपमा तयार झाल्यावर शेवटी वरून १ चमचा साजूक तूप सोडल्यास चव अधिकच छान लागते.
आल्याचा वापर: उपम्याला खरी चव आल्यामुळे येते, त्यामुळे आले किसून नक्की टाका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेरणादायी कथा : चला आनंद वाटूया