उन्हाळा आला की घरात चिप्स, पापड्या, कुरडया तयार केले जाते. गव्हाची कुरडई कशी बनवायची त्याला लागणारे साहित्य जाणून घेऊ या.
साहित्य : 2 वाटी गहू, मीठ, हिंग
कृती : गहू पाच दिवस पाण्यात भिजत घालावेत. पाणी दररोज बदलावे. नंतर ते मिक्सर मध्ये वाटून घ्या. गहू वाटून झाल्यावर एका भांड्यावर चाळणी ठेऊन वाटलेलं मिश्रण गाळून घ्या. गव्हाचा वाटणातुन त्यांचे सत्त्व(कोंडा) काढावे. कोंडा चाळणीत राहतो आणि चीक खाली भांड्यात एकत्र करा.त्यात पाणी घाला. कोंड्यातून स्वच्छ पाण्याने धुवून चीक काढून घ्या. चीक भांड्यात एकत्र करा.पुन्हा संपूर्ण चीक गाळून घ्या. हे सर्व मिश्रण एक दिवस झाकून ठेवा. त्यातील पिवळसर पाणी काढून घ्या. आता जितके मिश्रण आहे तितकेच पाणी चुलीवर ठेवावे. त्यात हिंग व मीठ अंदाजाने घालावे. उकळी आल्यावर त्यात वरील मिश्रण ओतावे.
एका हाताने ओतावे व दुसर्या हाताने ढवळावे. गाठी होऊ देऊ नये. मग गॅस वाढवून ते मिश्रण सतत हलवत राहा. त्यानंतर हळूहळू चिक घट्ट होऊ लागतो. त्यामुळे 10 मिनिटे गॅस बारीक करू चिक शिजवून घ्यायचा.
मग लाटण्याला लागलेला चिक गरम पाणी लावून काढून घ्या. पुन्हा एकदा चिकावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी वाफा काढून घ्या. त्यानंतर पुन्हा चिक हलवा. चिक हा चांगल्या घट्ट शिजवण्यासाठी आणखी 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्या. चिक घट्ट झाल्यानंतर साच्याला तेलाचा हात लावून गरम गरम चिक त्यात घाला.चांगले शिजल्यावर प्लॅस्टिकच्या कागदावर कुरडया घालाव्यात आणि वाळवून भरून ठेवाव्यात.