Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांची आई ......

सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांची आई ......
, शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (11:23 IST)
सिंधुताई सपकाळ एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. या हजारो अनाथ मुलांना सांभाळ करीत आहे. यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यांना "माई" म्हणून संबोधित केले जाते.
 
यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्राच्या वर्धा गावी एका गुरे चारणाऱ्याच्या कुटुंबात झाला. यांच्या बालपणीचे नांव "चिंधी" होते. लहानपणा पासूनच त्यांची शिकण्याची आवड होती पण त्यांचा आईचा याला विरोध होता. तरीही त्यांनी वडिलांच्या सहकार्यमुळे 4थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्या वयापेक्षा खूप मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. सासरी त्यांना फार जाच होता. घरात शैक्षणिक वातावरण नव्हते पण यांना शिक्षणाची फार आवड असायची. 
 
जंगलातून लाकडं गोळा करून आणावे लागायचे तसेच गुऱ्यांचे शेण गोळा करावे लागायचे. त्या काळी शेकडो गुरं असल्याने शेण गोळा करतं करतं बायकांची कंबर मोडायचा त्यांना फार त्रास होत होता. वन्य विभाग आणि गावातील जमींदार त्या बायकांना शेण गोळ्या करण्याचा मोबदला देत असे पण त्यांचे शोषण पण करत असे. ताईंनी त्यांच्या शोषणाच्या विरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वचपा त्या जामीदाराने त्यांच्या चारित्र्यावर आक्षेप लावून काढला. ताईंना वयाच्या 18 वर्षापर्यंत तीन अपत्यं झाली. चौथ्या बाळंतपणाच्या वेळी त्यांना त्याच्या पतीने चारित्र्य संशयावरून घरातून बाहेर काढले. 
 
14 ऑगस्ट 1973 रोजी त्यांनी एका गोशाळेत एका गोंडस कन्या ममताला जन्म दिला. त्यांना त्यांच्या माहेरी आल्यावर पण आईच्या नाराजीला सामोरी जावे लागले माहेरीपण त्यांना कोणीही आश्रय दिला नाही. त्या तिथून परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्थानकांवर भीक मागत हिंडायचा. रेल्वेच्या डब्यामध्ये गाणी म्हणून भीक मागून स्वतःचे आणि लहानग्या बाळाचे पोट भरायच्या. रात्री रेल्वे स्थानकांवरच झोपायचा. दिवसभर मागून आणलेली भीक मधले अन्न त्या दुसऱ्या भिकार्‍या सोबत वाटून खायच्या. त्यांच्या सोबत त्यांनी तब्बल 21 वर्षे काढले. 
 
नंतर त्या महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिखलदराला आल्या. येथे वाघांच्या संरक्षण प्रकल्पामुळे जवळपास 84 आदिवासी गांव हद्दपार करण्यात आली होती. सिंधुताईंनी असहाय्य आदिवासींच्या पुनर्वसनासाठी लढा केला आणि वनाधिकाऱ्यांच्या मदतीने आदिवास्यांच्या पुनर्स्थापनेसाठी व्यवस्था केली. त्यांनी आपल्या मुलीला पुण्याच्या एका ट्रस्टकडे पाठवले. अनाथ मुलांच्या सांभाळ करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रमानंतर आपले पहिले आश्रम चिखलदरा येथे उभारले. अनाथ मुलांच्या चांगल्या प्रकारे संगोपन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलीला लांब ठेवले त्या अनाथ मुलांना पोसण्यासाठी घरोघरी जाऊन भीक मागायचा. त्यांनी त्याचा आश्रमाचे नांव ममता बाल सदन ठेवले. अनाथ मुलांना सांभाळून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांनीही या सदनेची स्थापना केली. इथे बेवारस मुलांना शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा संस्थेकडून दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन दिली जाते. स्वावलंबी झाल्यावर त्यांना योग्य जोडीदार शोधून देण्याचे कार्यपण संस्था करते. जवळपास 1050 मुले या संस्थेत निवारा घेऊन आहे. त्यांना सर्व मुले "माई"म्हणून संबोधित करतात. त्यांची अनेक दत्तक घेतलेले मुलं-मुली डाँक्टर, वकील, इंजिनियर झाली आहे. आता ह्या आश्रमाला त्यांची स्वतःची मुलगी आणि दत्तक घेतलेले मुले चालवतात. ताईंनी आपल्या संस्थेच्या प्रसार आणि प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय दौरे केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी समाजाला प्रभावित केले आहे. परदेशातून पण त्यांच्या संस्थेला अनुदान मिळविण्यासाठी त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन नामक संस्थेची स्थापना केली आहे. सिंधुताई यांनी ह्याच्या समकक्ष अनेक संस्थाही स्थापित केल्या आहे.
 
बाल निकेतन हडपसर पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा
अभिमान बाल भवन वर्धा 
गोपिका गाईरक्षण केंद्र वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
 
पुरस्कार आणि गौरव-
सिंधुताईंना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेंकडून सिंधुताई सपकाळ यांना सुमारे 270 पुरस्कार मिळाले आहेत. 2010 मध्ये त्यांच्यावर आधारित बायोपिक ‘मी सिंधुताई सपकाळ’  चित्रपटाच्या रूपाने प्रदर्शित झाला. त्यांना अनेक पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, पुण्याचे अभियांत्रिकी कॉलेजचा "कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुरस्कार", मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, सोलापुरातील डॉ.निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, दत्तक माता पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, राजाई पुरस्कार, रिअल हीरो पुरस्कार, सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. आजही, वयाच्या 69 व्या वर्षी त्या अनाथ मुलांचे भविष्य घडविण्यासाठी कार्ये करत आहे. त्यांच्या ह्या कारकीर्दीला मानाचा मुजरा....सलाम या मातेला....... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज