आज वाटलं सहज, घ्यावा ठाव "स्त्री"मनाचा,
इच्छा एक, तिच्यात डोकावून बघण्याचा,
कित्ती तरी मनाचे वेगवेगळे होती रूपे,
काही कळायला अवघड, तर काही खूप सोपे,
काहींचा भाव होता उदात्त, अन खूप संयमी,
काही होत्या उथळ,अन काही कर्तव्यप्रेमी,
दुसऱ्यांचा संसार उध्वस्त करणाऱ्याही मिळाल्या,
उभारी देऊन काही सावरणाऱ्या सुद्धा गवसल्या,
ममतेने ओतप्रोत मताभगिनी ही कित्ती तरी,
स्त्री मनाची कित्ती रूपे, हे समजले तरी,
एकाच तराजूत नाही मोजता येणार सार्यांना,
जसे ज्याची काम तसं ओळखावं त्यांना!
म्हणून तर म्हणतात न!ठाव घेणं सोप्प नाही,
मनाच्या राज्यात सऱ्यांच्या वेगळंच चाललंय काहीबाही!