Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज नाश्त्याला काय बनवू?

आज नाश्त्याला काय बनवू?
, शनिवार, 6 मार्च 2021 (12:34 IST)
मैं और मेरी तन्हाई, 
अक्सर ये बातें करते हैं
आज नाश्त्याला काय बनवू? 
अन जेवायला काय करू? 
 
डोक्याचं पार भजं होतं, 
कुणाची फर्माईश पुरी करू
ह्याला काय आवडेल, 
त्याला काय पसंद पडेल 
 
मैं और मेरी तन्हाई, 
अक्सर ये बातें करते हैं 
पोह्यांचा रतीब असह्य झालाय
मलाही .. पोरांनाही . .   
उपम्याचा जो आलाय वैताग, 
त्याला तर उपमाच नाही
रोज रांधायचं काय हीच चिंता, 

करने को बहुत कुछ है, 
मगर कैसे करे हम 
कब तक यूँही 
थालीपीठ और 
दडपे पोहे सहें हम 
 
दिल कहता है, 
असेल नसेल ते कडधान्य शिजव
त्यात गाठे, शेव, चिवडा वाट्टेल ते फरसाण ओत
आणि सांग ..
हां यही मिसळ है, मिसळ है, मिसळ है !!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश चाहत्यांसह नवीन तारीख शेअर केली