महिलादिनी नकोय फक्त कार्यक्रम रंगबिरंगी,
खरोखरची अपेक्षित आहे, तिची ,एकमेकींशी सलगी,
दुःख एक दुसरीचे हवंय समजायला,
फ़ंदात पडायचं नाही हिला तिला हीणवायला,
प्रत्येकीची क्षमता वेगवेगळीच असते,
जीची तिची लढाई तिने आयुष्यात केलेली असते,
का म्हणून मग एकाच तराजूत तोलायचे,
एकमेकींचे मूल्य एकमेकांनी जाणायचे,
तरच खऱ्या अर्थाने महिलादिन होईल आनंदाचा,
साजरा होईल तो सोबतीने मिळालेल्या आदराचा !